चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर - शहरांत पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये शहरातील आदम नगर भागातील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं, त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्याठिकाणी महानगरपालिकेच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. ही परिस्थिती ज्या भागांमध्ये उद्भवली आहे, तेथील विषयी गंभीरित्याने लक्ष देऊन लातूर महानगरपालिकेने लोकांच्या घरकुलाची तातडीने सोय करून त्यांना टॅक्स माफ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. या संबंधीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.
0 टिप्पण्या