Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात बैठक संपन्न!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
वाशिम : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात विश्रामगृह वाशिम येथे बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शक म्हणून वाशिम जिल्ह्याचे समन्वयक ऍड. खतीब होते. सोबतच विद्वत्त सभेचे भास्कर भोजने उपस्थित होते. 

जिल्हाध्यक्ष किरणताई गिऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांना आपली मत मांडण्याचा आणि जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकी संदर्भात रणनीती आखण्यात समाविष्ट करून घेण्यात आले. तसेच सर्वांची मतं या संदर्भात जाणून घेण्यात आले. आगामी निवडणूक ताकतीनिशी लढू आणि निवडून आणू. यावर कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भर दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या