चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, चंद्रपूर यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी शिवशौर्य फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमितजी गुंडावार व उपाध्यक्ष श्री. विशालजी ठेंगणे यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे व प्रेरणादायी जीवनाचे अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, चंद्रपूर यांचे मनःपूर्वक आभार मानले.
0 टिप्पण्या