चित्रा न्युज प्रतिनिधी
उमरेड :- तालुक्यातील बोरी मांजरा येथे आदरणीय फत्तुजी राऊत सामाजिक कार्यकर्ते यांच्या राहते घरी, घर वास्तुपूजन, वैशाख पौर्णिमा निमित्त, दिनांक -13/05/2025 रोज मंगळवार ला सायंकाळी नऊ वाजता बुद्ध भीम गीतांच्या संगीतमय प्रबोधनाच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला, सर्वप्रथम विश्वाला शांतीच्या संधी देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील विदर्भ संघटक प्रमुख, महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन केले त्यांच्या सत्कार करण्यात आला, याप्रसंगी विदर्भ उपप्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे शाहीर अरुण मेश्राम, बँजो मास्तर अरविंद पाटील, ना ल वादक दयाळ गेडाम, तबलावादक संगपाल गेडाम, कार्तिक कगा ली, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कांबळे, प्रबोधनकार भिमशाहिर प्रदीप कडबे, कार्यक्रमाचे आयोजक फत्तु राऊत यांनी केले आभार प्रदर्शन शिवाजी कांबळे यांनी केले, गावातील नागरीक गायक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या