Ticker

6/recent/ticker-posts

अतिक्रमणाचे इमले वाढल्यामुळे हाळी-हंडरगुळीतील महामार्ग बनतोय अरुंद बोळ ..!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-उदगीर-अहमदपुर जाणारा महामार्ग हा तेलंगणा,आन्ध्रप्रदेश,कर्नाटक या तीन परराज्यांना जोडणारा असल्या- मुळे या रोडवर वाहनांची मोठी गर्दी असते.परंतू हाळी-हंडरगुळी येथे या मार्गावर शेकडो लोकांना अतिक्रमण करुन मोठमोठे इमले बांधल्यामुळे आज हा महामार्ग एखाद्या गल्ली , मोहल्यातील बोळा (रस्त्या) सारखा दिसत आहे.आणि याला सार्वजनिक बांधकाम विभागाचा 'डरपोकपणाच' कारणीभुत आहे.म्हणुन आज छोटा बोळा (गल्लीतील रस्ता) दिसणारा हा महामार्ग सा.बां.विभागाच्या दुर्लक्षामुळे व वाढत चाललेल्या मोठ मोठ्या अतिक्रमनामुळे भविष्यात 'पायवाट' बनणार यात शंका नाही. तेंव्हा लातुरचे सिंघम तथा तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक मा. निकेतन कदम यांच्यासारखे 'धाडस' दाखविणार कोण व कधी?
कारण,याबाबत अनेकदा पेपरबाजी करुन व माहिती देऊनही बघतो, नोटीसा देतो,असे म्हणण्याचे तोंडी 'धाडस' दाखविले.प्रत्येक्षात कारवाई माञ ० शुन्य ! 
म्हणुन तत्कालीन i.p.s.निकेतन कदम यांच्यासारखे 'धाडस' दाखवणे अत्यंत गरजेचे आहे,अन्यथा हा महामार्ग 'पायवाट' झालाच म्हणुन समजा ! 
दोन-अडीच वर्षापूर्वी येथील एका पञकाराने या महामार्गावरील सत्य परिस्थिती {अतिक्रमण} याची माहिती व या मार्गासह गावाचे म्हत्व व वैशिष्ट्य याचीही माहिती देऊन हे अतिक्रमण हटविण्याची विनंती केली असता,तत्काळ पथकासह स्पाॅट पाहणी केली.आणि संबंधित व्यक्तींना अतिक्रमण काढूण घेण्याचे फर्मान सोडले.तेंव्हा क्षणार्धात सर्व अतिक्रमणधारकांनी चुटकीसरशी अतिक्रमण काढुन घेतले.म्हणुन या रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता. पण कांही दिवसांनी बढतीवर i.p.s. निकेतन कदम यांची डीसीपी म्हणुन नागपुर येथे बदली झाली.आणि पुन्हा स्व:ताची खानदानी प्राॅपर्टी असल्यासारखे त्याच लोकांनी पुर्वी पेक्षाही मोठ्याप्रमाणात महामार्गावर अतिक्रमण करुन आपले इमले उभा केले.आणि याला सा.बां.विभागाचे बळ/पाठबळ मिळत आहे.असे स्पष्ट बोलले जाते.कारण,पेपरबाजी करुन व माहिती देऊन सुध्दा पाहतो,बघतो, नोटीसा देतो.असे म्हणण्यापलीकडे प्रत्यक्षात त्या अधिका-याने ग्राऊॅंड- वर उतरुन निकेतन कदम साहेबां- सारखे धाडस दाखविले नाही.म्हणुन येथे अतिक्रमण वाढतच चालल्याचे व यामुळे हा महामार्ग सध्या अरुंद बोळ बनल्याचे दिसत असलातरी भविष्यात हा रोड पायवाट बनायला वेळ लागणार नाही,तेंव्हा वरीष्ठांनी याची पाहणी करुन कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
 
जिल्हाधिकारी मॅडम तसेच नूतन पोलीस अधिक्षक लक्ष देतील का ??


कारण,हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे.तसेच या मार्गालगत येथील बाजार पेठ,शासकिय,निमशासकिय कार्यालये,दवाखाने,मेडीकल्स आदी आस्थापणे व बस थांबे असल्यामुळे परिसरातील आनंदवाडी, गादेवाडी, मोरतळवाडी,चिमाचीवाडी,सुकणी, वडगाव,शेळगाव,टाकळगाव, झरी, बोरगाव,रुद्रवाडी,चिद्रेवाडी,वायगाव सय्यदपूर,बोडका,कुमठा,शिवनखेड सह ५०/६० गावातील जनता तसेच वाहनांची मोठी गर्दी रोज या रोडवर असते.पण सर्वांना या अतिक्रमनाचा मोठा अडथळा होत असतो.तसेच थांब्यावर बसेस थांबायला जागाच शिल्लक राहत नाही.यामुळे दररोज कांही वाहनधारकाशी अतिक्रमण- धारक कुरबुर करत असतात.व आज होणारी छोटीशी कुरबुर भविष्यात उग्ररुप घेऊन सामाजिक शांततेमध्ये मोठा ब्लास्ट (वाद) होऊ शकतो.तरी वरील सर्व बाबीचा विचार करुन नुतन पोलीस अधिक्षक जयंत मीना तसेच जिल्हाधिकारी वर्षाताई घुगे मॅडम यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे तेंव्हा हे दोन बहाद्दर व कर्तबगार अधिकारी बहाद्दुरी व कर्तबगारी दाखविणार का व कधी.याकडे या भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.
——————————————

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या