Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना निर्देशजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आपत्कालीन यंत्रणांचा आढावा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास गृह विभाग, आरोग्य यंत्रणा यासह अन्य महत्त्वाच्या सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी आज दिले. 

सुरक्षेच्या उपायोजना तसेच आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणांची पूर्वतयारी बाबत ही बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हाधिकारी संजय कोलते, प्रभारी पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे आरोग्य यंत्रणा व सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  अभिषेक नामदास यांनी सादरीकरण सादर करून यंत्रणांच्या जबाबदारी आणि भूमिकेची मांडणी केली. 

अतिरिक्त शल्य चिकित्सक, पोलीस निरीक्षक वाहतूक, दहशतवाद विरोधी पथक, मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा या सर्व यंत्रणांनी कार्यवाही यंत्रणा म्हणून काम करताना समन्वय, संपर्क, आणि सजगता या तीन  सूत्रावर काम करावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सर्व यंत्रणांनी त्यांच्याकडील असलेली साधनसामग्री तपासून ती जास्तीत जास्त अद्यावत करावी. यंत्रणेच्या सुसज्यतेमध्ये असणाऱ्या त्रुटी दुर कराव्यात  प्रामुख्याने साधनसामग्रीची  अनुपलब्धता किंवा ती दुरुस्त नसणे हे लक्षात घेता तातडीने ॲम्बुलन्स ,फायर ब्रिगेड मशनरी ,ह्या मशिनरींची सुसज्जता सर्व आस्थापनांनी तपासून घ्यावी. तसेच उपविभागीय अधिकारी महसूल, पोलीस अधीक्षक भंडारा व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी संभाव्य आपत्तीशी तोंड देण्यासाठी आवश्यक असणारे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावे. 

आपत्कालीन परिस्थितीमध्ये वाहतुकीसाठी तहसीलदार भंडारा, जिल्हा पुरवठा अधिकारी, बीएसएनएलची यंत्रणा ,पाटबंधारे विभाग, शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी देखील वाहनांची सुसज्जता वाहनांची उपलब्धता याबाबत आपल्या अधिनस्त यंत्रणेकडून आढावा घेऊन तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा.

 आपत्कालीन परिस्थितीमध्ये माध्यमांशी व संपर्कासाठी जिल्हा माहिती अधिकारी काम पाहतील. पोलीस अधीक्षकांनी पोलीसातील सर्व विभागासमवेत समन्वय करणे व त्यांना आवश्यक ते निर्देश देणे तसेच आवश्यकतेनुसार सर्व आदेश निर्गमित करण्याचे सूचित करण्यात आले. प्रशासनातील सर्व विभागाशी समन्वय करणे व त्यांना आवश्यक दिशा निर्देश देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यरत राहतील. आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाची भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडणी अनुषंगाने खंडन व उच्च प्रसारित करणे या बाबींसाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यरत राहतील. आपत्कालीन परिस्थिती संसाधने, यंत्र साहित्य ,वाहने ,अन्नसामग्री मनुष्यबळ यासाठीची तातडीची निकड लक्षात घेता, सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या