पहिल्या वर्गा पासून सोबत असलेल्या मयुरी आणि रेणूका या दोन जिवलग मैत्रिणीचा निकाल सारखा
चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:-कृषक सुधार मंडळ,तळेगाव दशासर द्वारा संचलित माध्यमिक कन्या विद्यालयाचा वर्ग 10 विचा निकाल 100% लागला असून 14 विद्यार्थिनी प्राविण्य श्रेणी,14 प्रथम श्रेणी व 5 विद्यार्थिनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्यात.
विद्यालयातून प्रथम भाविका सचिन बागडे 87.60%,द्वितीय त्रिशाली रामेश्वर मेश्राम83%,तृतीय मयुरी किशोर चौधरी व रेणुका सतीश गायकवाड 82.8% यांनी प्राप्त केला.
प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थिनींचे त्यांच्या घरी जाऊन परिवारासह पुष्पगुच्छ आणि पेढे भरवून अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि विद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.दरवर्षीप्रमाणे वरील चारही विद्यार्थिनीच्या वर्ग 11 व 12 वीच्या शालेय खर्चाची जबाबदारी संस्थेने घेतली.
0 टिप्पण्या