Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी मजुरांच्या थकलेल्या रकमा वन विभागाने तातडीने द्याव्यात ; वंचित बहुजन आघाडीची मागणी!

वनविभागातील भ्रष्टाचार प्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करा 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
शिरपूर, (धुळे) - रोहिणी फॉरेस्ट अंतर्गत प्लँटेशनसाठी मोठ्या प्रमाणात खड्डे खोदकाम करणाऱ्या मजुरांच्या थकलेल्या रकमा वनविभागाकडून अद्याप न मिळाल्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात चौकशीची मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आरएफओ (RFO) शिरपूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रोहिणी फॉरेस्ट परिसरात प्लँटेशनच्या कामासाठी  एक लाख सोळा हजारांचे बिल मंजूर करूनही 
संबंधित मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला दिला नाही. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील असून आदिवासी समूहाचे आहेत. त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला देण्यात यावा. 

यासाठी वंचित बहुजन आघाडीने वनविभागाच्या शिरपूर येथील कार्यालयासमोर आंदोलन केले असून, दोषी अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करून त्यांच्या हक्काची मजूरी देण्याची मागणी केली. या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या