Ticker

6/recent/ticker-posts

अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई शेतक-यांना द्या- बिरसा फायटर्सची मागणी


गटविकास अधिकारी शहादा व तळोदा यांना बिरसा फायटर्सचे निवेदन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा/ तळोदा :-अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचा पंचनामा करून शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा व तळोदा यांना देण्यात आले.शहादा येथे निवेदन देतांना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,प्रभूदत्तनगरचे अरूण पावरा ,लोहाराचे सुरेश पवार,रामदास मुसळदे व तळोदा येथे निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,बिलीचापडा गाव अध्यक्ष वनसिंग पटले,तळोदा तालुका सचिव किसन वसावे,हाना पटले आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                   महाराष्ट्र राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. दिनांक ४ मे २०२५ ते १२ मे २०२५ दरम्यान नंदुरबार जिल्ह्य़ात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे,पडत आहे. अवकाळी पावसामुळे नंदूरबार जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिथे जिथे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे तिथे पंचनामे करणे आवश्यक आहे. अवकाळी पावसामुळे धान्य भिजले आहे.गहू,मका,हरभरा,कांदा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतक-यांना पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळणे अत्यावश्यक आहे.तरी आपल्या तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांचे पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत व शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा व तळोदा अशा दोन ठिकाणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या