Ticker

6/recent/ticker-posts

आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमशा पाडवींच्या सभेला खाली खूर्च्या!आदिवासी संघटनांचे काळे झेंडे आंदोलन गाजले!



चित्रा न्युज प्रतिनिधी 
 शहादा: १६ मे २०२५ रोजी शहादा येथे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेला शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी व अक्कलकुवा- अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार 
 आमदार आमशा पाडवी असे २ आमदार आले होते.परंतू या सभेला जनतेने पाठ फिरवली. सभेत खाली खुर्च्या दिसून आल्या. ५० लोकही सभेला आले नाहीत. उलट या सभेला येणा-या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशीविरोधात आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन सुरू केले तेथे २०० पेक्षा अधिक लोक जमली व काही वेळ रस्ता चक्का जाम झाला.चोर आला चोर आला आदिवासींच्या जमिनी चोरणारा चोर आला,अशा घोषणांमुळे आदिवासी संघटनांचे आंदोलन मात्र गाजले.
               सभेला आलेली ५० लोकसुद्धा स्वईच्छेने आले नसतील, भाड्याने आणले असतील.कारण सभेसाठी शहरातील मुख्य रस्ता बंद करण्यात आला होता,त्यामुळे रस्त्यावरील बघे लोक सभेला दिसतात.यापेक्षा तर आमच्या बिरसा फायटर्सच्या पिंपर्डे येथील गाव शाखा उद्घाटनात जास्त लोक आली होती.या आमदारांना लाजा वाटायला पाहिजे,२ आमदार व सभेला लोक फक्त ५०? असा टोला सुशिलकुमार पावरा यांनी लगावला आहे.
                  चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर हडप केल्या आहेत व शहादा विधानसभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ असतांना चंद्रकांत रघुवंशी हा मतदारसंघ खुला मतदारसंघ करण्याची मागणी करत आहेत, म्हणून सभेला लोक आली नाहीत का? अशी ऊलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या