Ticker

6/recent/ticker-posts

लोकांना लुटणाऱ्या खराडी येथील कॉल सेंटरवर छापा:गुजरात आणि राजस्थानच्या ५ भामट्यांना अटक: पुणे पोलीसांची धडाकेबाज कारवाई.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे-अमेरिकन नागरिकांना सायबर गुन्ह्यातील डिजीटल अरेस्टची भिती दाखवुन मिलियन्स यु.एस. डॉलर ला गंडा घालणारी खराडी येथील कॉल सेंटर कंपनीवर छापा टाकुन पुणे पोलीसांची धडाकेबाज कारवाई केली आहे.हे कल सेंटर चालविणाऱ्या गुजरात आणि राजस्थानच्या ५ जणांना अटक केली आहे. यांच्याकडे १११ पुरुष व १२ महिला कामाला ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
प्राईड आयकॉन खराडी मुंढवा रोड पुणे या बिल्डिंगमध्ये ०९ व्या मजल्यावर मैग्नेटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंस एलएलपी हे अनाधिकृत कॉल सेंटर सुरु असुन या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन नागरीकांना त्यांचे अॅमेझॉन खात्याचा गैरवापर झाला असुन त्यातुन ड्रग्जची तस्करी झाल्याचे सांगुन त्यांना डिजीटल अटकेची भिती दाखवुन त्यांची फसवणुक करण्याकरीता बोगसकॉल सेंटर चालविले जात आहे. अशी गुप्त बातमी मिळाल्याने वरिष्ठांच्या पुर्व परवानगीने सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर व गुन्हे शाखा, पुणे कडील पोलीस अधिकारी व स्टाफ असे तात्काळ मैग्नेटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंस एलएलपी, प्राईड आयकॉन, ०९ वा मजला, खराडी, मुंढवा रोड, पुणे या ठिकाणी येवुन सदर कॉल सेंटर बाबत खात्री करुन शिताफिने मैग्नेटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंस एलएलपी येथे मध्यरात्री छापा टाकला असता सदरचे कॉल सेंटर हे विनापरवाना चालवत असुन तेथे अनधिकृत कॉल सेंटर चालु असल्याचे निदर्शनास आले.
सदर अनधिकृत कॉल सेंटर मैग्नेटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंस एलएलपी ची तपासणी केली असता आरोपी १) सरजितसिंग गिरावत सिंग शेखावत, सध्या रा. खराडी, पुणे मुळ रा. झुंझुना, राजस्थान २) अभिषेक अजयकुमार पांडे, सध्या रा. खराडी, पुणे मुळ रा. अहमदाबाद, गुजरात ३) श्रीमय परेश शहा, सध्या राखराडी, पुणे मुळ रा अहमदाबाद, गुजरात, ४) लक्ष्मण अमरसिंग शेखावत, सध्या राखराडी, पुणे मुळ रा. अहमदाबाद, गुजरात, ५) अॅरोन अरुमन खिश्चन, सध्या राखराडी, पुणे मुळ रा अहमदाबाद, गुजरात हे सायंकाळी ०६.०० वा ते पहाटे ०२.०० वा पर्यत अमेरिकन वेळेनुसार कॉल सेंटर चालवत असुन कॉल सेंटरमध्ये १११ पुरुष व १२ महिला काम करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांचेकडील लॅपटॉपची पाहणी केली असता कॉलसेंटर मध्ये वरिल आरोपी व कर्मचारी हे लॅपटॉपमध्ये अनेक संशयास्पद अॅप्लीकेशनचा, व्हिपीएन सॉफ्टवेअर चा वापर करुन कॉलर माईकव्दारे अमेरिकन नागरीकांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन अॅमेझॉन अकाउंटचा बेकायदेशिर वापर होत असुन त्यामधुन ड्रग तस्करी केली जात असुन तेथील नागरिकांना डिजीटल अरेस्टची भिती दाखवुन त्यांना गिफ्ट कार्ड विकत घेण्यास भाग पाडुन ते गिफ्ट कार्ड आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरत असल्याचे निष्पन्न झाले. याकरीता त्यांचेकडे अमेरिकन नागरिकांच्या मोबाईल क्रमांकाचा लाखांच्या सख्येतील डेटा लॅपटॉपमध्ये मिळुन आलेला आहे.वरिल ५ आरोपी यांना पोलीसांनी शिताफिने ताब्यात घेतलेले असुन मैग्नेटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंस एलएलपी, या अनधिकृत कॉल सेंटरमध्ये ९,६०,०००/- रु किं. एकुण ६४ लॅपटॉप, ४,१०,०००/- रु किंएकुण ४१ मोबाईल फोन, तसेच ४००० रु किं. एकुण ०४ राउटर, कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचा-यांची ओळखपत्र तसेच अमेरिकन नागरीकांना फसवणुक करण्यासाठी कर्मचा-यांना दिलेली इंग्रजीमधील संवादाची स्क्रिप्टची कागदपत्रे, इ. असा एकुण १३,७४,०००/- रु किं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरबाबत सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजिनं ५७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चेकलम ३१६(२), ३१८(४),६१ (१), ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील आरोपी यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर सायबर गुन्हे करण्याचे कनेक्शन तपासात निष्पन्न झाले असुन गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असुन सदर गुन्ह्यात आरोपी यु.एस डॉलर ची फसवणुक रक्कम भारतीय बँकांचा वापरकरुन हवाला किंवा क्रिप्टो करन्सी मार्फत फिरवतात किंवा त्याची मोठ्या प्रमाणात आफरातफर करीत आहेत याबाबत तपास पथक गुन्ह्याचा तांत्रिक व क्लिष्ट सखोल तपास करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेशकुमार,पोलीस सह आयुक्त रंजनकुमार, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) निखिल पिंगळे, मा. पोलीस उप आयुक्त (आर्थिक व सायबर), विवेक मासाळ सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, सायबर पो. ठाणे, पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक, तुषार भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे, पोलीस उपनिरीक्षक राम दळवी, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहा. पोलीस फौजदार कैलास चव्हाण, सहा. पोलीस फौजदार अविनाश इंगळे, पोलीस अंमलदार होले, वाघमारे, विजय पवार, बाळासाहेब सकटे, निलेश जाधव, हरीष मोरे, पोलीस अंमलदार विशाल इथापे, देविदास वांढरे, अमित जमदाडे, पो. अमंलदार ऋषिकेश व्यवहारे, निखीलजाधव, महिला पोलीस अंमलदार सीमा सुडीत, स्मिता हंबीर, जान्हवी मडेकर, पोलीस अंमलदार संदीप पवार, मांढरे, दिनेश मरकड, सचिन शिंदे, प्रविण रजपुत यांनी सदरची कामगिरी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या