चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:-दि.29 मे रोजी संभाजी ब्रिगेड धामणगाव रेल्वे तर्फे मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. सतत होत असलेल्या अवकाळी पावसामुळे तीळ या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शासनामार्फत लवकर लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत सरकार ने करावी यासाठी संभाजी ब्रिगेड धामणगाव तर्फे मा.तहसीलदार साहेब यांच्या मार्फत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री मा.चंद्रचेखरजी बावनकुळे यांना निवेदन दिले यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन मानकर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष सुयोग ठाकरे विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष मानस बोरघाटे, गोपाल पेदाम,सागर सोनटक्के, आशिष तुपट अजिंक्य शेंडे प्रशांत कापसे व संभाजी ब्रिगेड धामणगाव चे सर्व सहकारी उपस्थित होते
0 टिप्पण्या