चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : तालुक्यातील, गोरजा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा - कुडरारा( रै) येथे 04 मे 2025 रोजी सायंकाळी 05.00 वाजताच्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे मौजा - कुडरारा ( रै.) येथील DFU फ्लोराईड रिमुव्हल युनिट (जलशुद्धीकरण संयंत्र) संपूर्ण उडून गेल्यामुळे जलशुद्धीकरण संयंत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रामीण भागात झालेल्या वादळ वाऱ्याचा व पावसाचा जोरदार तडाखा बसला असून अनेक झाडे व अनेकांच्या घराच्या छतावरील पत्रे उडून गेल्याने भद्रावती तालुक्यातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


0 टिप्पण्या