Ticker

6/recent/ticker-posts

120 फुटाचा राज्यमार्ग झाला 10 फुटाचा.!!


हाळी-हंडरगुळी येथील बेशिस्त पार्किंगला शिस्त कोण लावणार?

चित्रा न्युज प्रतिनिधी 
उदगीर शहरानंतर तालुक्यात मोठे व नांदेड-बिदर राज्यमार्गावर असलेले हाळी-हंडरगुळी या 2 गावातून गेलेल्या नांदेड-बिदर या राज्यमार्गावर वाढलेले अतिक्रमण तसेच बेशिस्तीत थांबणा-या गाड्या यांच्यामूळे मध्यभागातून दुतर्फा १२० फुटाचा असलेला हा राज्यमार्ग १० फुटाचा झाल्यामुळे वाहनांना व पदचारी मंडळींना ये-जा करणे कठीण झाले आहे. या रोडवर मागील कित्येक वर्षापासून वाहतूकीचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे तसेच यामुळे अनेकदा 2 गटात कुरबुरी झाल्याचे दिसते.आणि या बाबत अनेक वेळा आवाज उठवून सुध्दा याकडे ना पोलीसांनी लक्ष दिले,ना आरटीओने,ना सा.बां.विभागाने.म्हणुन या गावात बेशिस्तीत गाड्या पार्क करण्याची 'रेस' लहान-मोठ्या वाहनधारकांमध्ये लागल्याचे व लहान-सहान अपघात होतानाचे चिञ दिसत आहे.हाळी-हंडरगुळीत बेशिस्तीत पार्किंग होणारे 'स्पाॅट' पुढील प्रमाणे आहेत. नांदेड-बिदर रोड,जि.प.कन्या शाळे पुढील रोड व मुख्य बाजार पेठ येथे बेशिस्तीत पार्किंग होत असल्याने वरील ठिकाणी विशेष म्हणजे राज्यमार्गावर हप्ताभर तसेच कन्या शाळे पुढे दर रविवारी न चुकता दिवसातून अनेकदा वाहतूक कोंडी होते. याकडे संबंधितांचे लक्ष जावे व कारवाही करावी,म्हणुन या विरुध्द अनेकदा सचिञ अशी न्यूज देऊन सुध्दा याकडे कोणीही लक्ष देत नाही.म्हणुन दि.29 मे 25 रोजी संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करुन पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे,अशी मागणी उपसरपंच मा. बालाजी भोसले- पाटील यांनी केली.तेंव्हा या बाबत कारवाही करण्याचे आदेश सपोनी. बी.एस.गायकवाड यांनी हंडरगुळी चौकीतील पोलीस कर्मचा-यांना दिले असलेतरी ही अद्याप कसलीच कारवाई झाली नसल्याने प्रशासनाच्या चुप्पी बद्दल जनतेत बोलाचाच भात बोलाचीच कडी ! अशी चर्चा ऐकीवात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या