कुठे पञे उडाली,कुठे झाडे पडली..!
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-दि.९ रोजी राञी ९ वा.दरम्यान अचानक वारे सुरु झाले.आणि मग या वा-याने अचानक 'गिअर' 'चेंज" केला आणि सौम्य सुटलेले वारे चक्री वा-यासारखे रौद्ररुप घेतले.आणि रस्त्यावरील धूळ अनेकांच्या घरात व दुकाणात घुसली तसेच घरावरील व हाॅटेल,दुकाण आदीवरील पञे भुर्रर्र झाली.सुदैवाने यात प्राणहानी झाली नसलीतरी या चक्रीवादळाला बघून हाळी-हंडरगुळीकर पुरते चक्रावुन गेले होते.कारण एकीकडे वा-याचा जबरदस्त वेग त्यात पाऊस आणि व नेहमीप्रमाणे गुल झालेली लाईट ! अशा या तीन तिगाडा काम बिघाडा च्या या 3 चक्रात सामान्य जनता भरडली गेली.हे माञ नक्की..!
———————————————
*10 घंटे लाईट बंद*
दि.८ व ९ रोजी राञी-मध्यराञी वादळीवा-यासह पाऊस सुरु होताच लाईट बंद केली.ती दुस-यादिवशी म्हणजे तब्बल १० घंट्यानंतर आली. यामूळे सामान्य जनता विशेषत: नवजात बालकांचा जीव कासावीस झाला.कारण,वारे,पाऊस,अंधार या मुळे पसरलेल्या डासांनी चावल्याने बालकांसह अनेकांनी राञ जागुन काढली असल्याचे समजते.
———————————————
0 टिप्पण्या