Ticker

6/recent/ticker-posts

भव्य राज्यस्तरीय बुद्ध भीम गीत गायन स्पर्धा -2025. प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या जाहीर सत्कार,


चित्रा न्युज प्रतिनिधी 
वर्धा :- अश्वघोष कला व सांस्कृतिक मंच वर्धा द्वारा आयोजित, लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त, स्मृतीशेष श्रीकांत जांभुरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, भव्य राज्यस्तरीय बुद्ध भीम गीत गायन स्पर्धा -2025, रविवार दिनांक-22/06/2025 रोजी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ- बजाज सार्वजनिक वाचनालय वर्धा, येथे मोठ्या उत्साहात बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम पार पडला, कार्यक्रमाचे उद्घाटक - सविता ताकसांडे नागपूर त्यांच्या हस्ते पार पडला, कार्यक्रमाचे अध्यक्ष - मुन्ना नाखले वर्धा, प्रमुख उपस्थिती - डॉक्टर मिलिंद सवाई, प्राध्यापक राजेश डंभा रे, प्राध्यापक ज्ञानेन्द्र मुनेश्वर, पद्मा तायडे, प्रशांत जा रो डे, मोहन शेवडे, भंते राजरत्न, राजूथु ल, शाहील द र णे, कार्यक्रमाचे आयोजक धनंजय नाखले इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून अभिवादन केले, याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विज्ञानवादी विचार - माझ्या दहा भाषणा एवढी ताकत, शाहिरांच्या एका गाण्यांमध्ये असते. कारण- आकाश मोजतो आम्ही भिमा तुझ्यामुळे, वादळ रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, गीत सादर केले व त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला, यावेळी गायक विजय मोरे, गायिका मंदा वाघमारे, गायक महेंद्र सावंग, दीपमाला मालेकर, कवी कमलेश पाटील, गायिका लाजरी भुरे, लाल चंद्र डांगे, गायिका जया मोरे भीम शाहीर प्रदीप कडबे, प्रकाश जी दे, लक्ष्मीनारायण सोनवणे, विशाल मानकर, मुकुंद नाखले, प्रदीप थु ल, सुनील ढाले, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक धनंजय नाखले यांनी केले, सूत्रसंचालन शाहील द र णे यांनी केली महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने गायक कलावंत उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या