Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी व वाढवणा येथे 5 लाख 57 हजार 400 रुपयांची धाडसी चोरी..!!चोरटे C.C.T.V.मध्ये कैद ..


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-दि.२४ ते २५ जुन रोजी राञी ८.३० ते पहाटे ४ वा.दरम्यान वाढवणा पाटी ता.उदगीर येथील पश्चीमेस असलेल्या श्रीयश इलेक्ट्रीकल्स हे दुकाण अज्ञात चोरट्याने फोडले व आतील टॅक्समो कंपनीचे ४ एमएम सबमर्सिबल वायर ४००० मीटर, बजाज कंपनीचे ६ टेबल फॅन,तीन किर्लोस्कर कंपनीचे १ एचपीचे पाणी मोटर,२ काॅम्टन कंपनीचे २ रिमोट व सिलिंग फॅन,राजलाईन कंपनीच्या ४ कुलरच्या मोटारी असा ४.८७.४०० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरी करुन नेल्याची फिर्याद नितीन कालीदास गुंडरे रा.एकुरका रोड या व्यापा-यानी दिली आहे.म्हणुन तसेच हंडरगुळी येथील माळी बोअरवेल्स & मशिनरी या दुकाणातुन सुझुकी कंपनीचे १२ एमएमचे १५० मीटर लांबीचे २ बंडल व अल्युमिनीयमचे वायर ४ बंडल आणि हाॅयल्स व किर्लोस्कर कंपनीचे १ एचपीचे दोन मोटारी असा ३९.००० हजार रुपये किंमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची फिर्याद मोहन जी. क्षिरसागर-माळी यांनी दिली आहे. म्हणुन वाढवणा पोलिस ठाण्यात  गुरनं.१८५/२५ कलम,३३१ {४} ३०५ (A) BnS नुसार दि.२५ रोजी सायं.उशीरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याचा पुढील तपास सपोनि.एस.पी.गायकवाड हे करत आहेत.
हंडरगुळी येथील माळी मशिनरी या दुकाणापुढे असलेला कॅमेरा अज्ञात चोरट्याने फोडून व शटर उचकटून आत प्रवेश केल्याचे तसेच याच दुकाणापुढे असलेल्या अशाच एका दुकाणाचे शटर उचलण्याचा प्रयत्न करताना तसेच माळी मशिनरी मध्ये चोरी करताना अज्ञात चोरटे CC TV कॅमे-यामध्ये दिसत आहेत.
ईलेक्ट्रीकल व मोटार रिवायडींगचेच वाढवणा व हंडरगुळी येथील दोन दुकाणे चोरट्यांनी फोडून ५ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन घेऊन गेल्यामुळे तसेच अशा प्रकारच्या अन्य एका दुकाणाचे शटर उचलण्याचा प्रयत्न केल्यामुळे हाळी हंडरगुळी व वाढवणा बुर्दूक येथील व्यापारीबांधवात व जनतेत भीती पसरली आहे. 
सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरट्यांना लवकरच जेरबंद करणार,असा ठाम विश्वास सपोनि.एस.पी.गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या