Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळी येथील बेशिस्त अल्पवयीन वाहनचालकांमुळे अपघात होण्याची भीती !

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-उदगीर तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ व लोकसंख्या असलेले तसेच नांदेड-बिदर महामार्गाशेजारी वसलेल्या हाळी-हंडरगुळी या दोन गावात व मेन मार्केट व महामार्गावर मिसुरडही न फुटलेले पोर दोन व 4 चाकी गाडी ट्रीपल,चोबल सीट्स अगदी बिनधास्त,सुपर फास्ट व वेडी-वाकडी स्टाईल मारत चालवत असतात.म्हणुन अपघात होण्याची व त्यात प्राणहानी होण्याची भीती आहे म्हणुन अल्पवयीन चालकांवर तसेच त्यांच्या पालकांवर पण महाराष्ट्र मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करावी,आणि २० जुन सारखी वाहन धरपकड मोहिम पुन्छ एकदा पोलिस प्रशासनाने राबवावी,अशी मागणी होत आहे.
आजवर येथे कुणीही कारवाई केली नव्हती.म्हणुन येथे कुठेही व कशाही प्रकारे वाहन पार्क करणे,धूम स्टाईल वेडीवाकडी ट्रीपल,चोबल सीट्स टू व्हिलर गाडी चालवणे असा प्रकार वाहनधारकांमध्ये मोठ्याप्रमाणामध्ये  वाढला होता.परंतू,२० जुन रोजी नुतन सपोनि.एस.पी.गायकवाड व कर्मचा-यांनी वाहतूक नियम पाया खाली घेणा-या वाहनधारकांवर कारवाही केली होती.म्हणुन कांही प्रमाणात वाहनधारकांमध्ये कायदा व खाकी वर्दी या बद्दल भीती बसली होती.व ही मोहिम सुरु केल्याबद्दल हाळीहंडरगुळीकरातील सुज्ञ नागरीकांतून कारवाइईचे व पोलिसां चे स्वागत व कौतूक होत होते.आणि ८ दिवसातुन दोन वेळा तरी अशी मोहीम राबवावी.अशी अपेक्षा / मागणी सर्व जेष्ठ स्ञी-पुरुष,व्यापारी यांच्यामधून होत होती.पण २० जुन नंतर का?कुणास ठाऊक ही मोहिम थंडावली!आणि पुन्हा वाहनधारकां मध्ये बेशिस्त व मुजोरी वाढली!असे चिञ गल्लीबोळासह महामार्गावर रोजच दिसते.
येथे बेशिस्त वाहनधारकांची विशेष म्हणजे वाहतूक नियमांची कसलीही माहिती नसलेल्या अल्पवयीन पोरांचे वाहन चालविण्याचे प्रमाण दररोज शेकडोंच्या घरात आहे.आणि असे हे मिसुरडंही न फुटलेल्या पोराटोरांना वाहन चालवण्याचे लायसन्स कोणी व का? दिले.
येथे बेशिस्त वाहनधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रोज अनेकदा ट्रॅफीक जॅम होते.कारवाई कुणीच करत नसल्याने धूम स्टाईल गाड्या चालविणारे चालक,पोरं टोरं बेशिस्तस्तपणे गाड्या पार्क करताना दिसतात.परिणामी,अधून,मधून छोटे मोठे अपघात होताना दिसतात.अशा वाहनधारकांना शिस्त लागावी आणी   रस्ते अपघात होऊ नये,म्हणुन २० जून रोजी केलेली कारवाई थंडावली असल्यानेच पुन्हा बेशिस्तीत वाढली आहे.म्हणुन पुन्हा-पुन्हा कारवाईचा दंडुका उगारणे गरजेचे आहे.अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे.बेशिस्त वाहनधारकांना आता खाकीवर्दीतले "दादा" मंडळी कारवाईचा "धडाका" पुन्हा देतील का व कधी? याकडे सर्व जेष्ठ व सामान्य हाळी-हंडरगुळीकर जनतेचे लक्ष लागले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या