Ticker

6/recent/ticker-posts

स्व. सुनील नामदेव देवतळे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शिवसेनेचे धारिवाल कंपनीला निवेदन – अन्यथा आंदोलनाचा इशारा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : श्री. सुनील नामदेव देवतळे, रा. घोडपेठ, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर हे धारिवाल थर्मल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ताडाळी या कंपनीत G.T.I. Security मधून कार्यरत होते. त्यांची प्रकृती अस्वस्थ राहिल्याने दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

निधनानंतर तीन महिने उलटूनही कंपनीकडून स्व. देवतळे यांच्या कुटुंबाला देय असलेली उर्वरित रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. याशिवाय कंपनीच्या वतीने त्यांच्या मुलीला नोकरीवर घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यांच्या पत्नीला देखील कंपनीकडून कोणतीही पेन्शन सुविधा अद्याप मिळालेली नाही.
या अन्यायकारक व असंवेदनशील वर्तनाविरोधात शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात व शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वात धारिवाल कंपनीच्या महाव्यवस्थापकांना (GM) निवेदन देण्यात आले. निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:

1. स्व. सुनील देवतळे यांची उर्वरित रक्कम त्यांच्या कुटुंबास त्वरित द्यावी.

2. त्यांच्या पत्नीला कंपनीकडून नियमित पेन्शन सुविधा देण्यात यावी.

3. त्यांच्या एका मुलीला तत्काळ कंपनीत नोकरीत घेण्यात यावे.

या मागण्या 15 दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास शिवसेनेच्या वतीने धारिवाल थर्मल कंपनी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व कंपनी बंद पाडण्याचा इशारा शिवसेना नेते श्री. सुरज शहा यांनी दिला आहे.

शिवसेना सदैव अन्यायग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल असून, देवतळे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील. यावेळी शिवसैनिक सुरज भाऊ शाहा, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, शिवसैनिक सुमित हस्तक, शिवसैनिक दीप गारघाटे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या