Ticker

6/recent/ticker-posts

करमाळा तालुक्याच्या शिरापेच्यात आणखीन एक मानाचा तुरा


मांगी येथील पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर यांना बालगंधर्व रंगमंदिर परिवारातर्फे युवा पार्श्वगायक "पुरस्कार  प्रदान...

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-करमाळा तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र पुणे येथील आर्केस्ट्रा म्युझिक कलर्स चे संचालक प्रवीणकुमार अवचर यांना २०२५ यावर्षीचा बालगंधर्व रंगमंदिर परिवारातर्फे" युवा पार्श्वगायक " हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिराच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त .हा पुरस्कार सोहळा .
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.
२४ जून पासून सुरु झालेल्या या नेत्रदीपक  सोहळ्याची  काल दिनांक काल गुरुवार दिनांक २६ जून रोजी सांगता झाली.
या तीन दिवसाच्या वर्धापन दिन महोत्सवामध्ये अनेक कलावंतांचे, राजकीय सामाजिक, शैक्षणिक ,कला क्रीडा ,क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचे चित्रपट सृष्टी तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. श्री प्रवीण अवतर हे करमाळा तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र असून ते गेल्या  ३० वर्षापासून संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या ३० वर्षांमध्ये  भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज पार्श्वगायक, गायिकांसह चित्रपट अभिनेत्यांसोबत देश-विदेशात आतापर्यंत हजारो कार्यक्रम केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक कार्यात विशेष सहभाग आहे.
"साक्षरता अभियान " "बेटी बचाव बेटी पढाव " कोरोना सारख्या महामारीच्या काळात कोरोना जनजागृती च्या मोहिमेत विशेष सहभाग. आजपर्यंत त्यांना कलाक त्यांच्या गायन कलक्षेत्रासह ,राजकीय सामाजिक ,क्षेत्रातून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
 त्यांचे गायनाची सुरुवात वडील जनार्धन अवचर ,आई सत्यभामा अवचर  ,मोठे बंधू राजेंद्र अवचर, तसेच मधवे बंधू कै. सुहासकुमार अवचर यांचे मार्गदर्शनाखाली घरातूनच झाली. त्यावेळी त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी करमाळा येथील नामांकित बँडमधुन गायन क्षेत्रात पदार्पण केले. नंतर अहिल्यानगर येथील  संगम मेलोडीज आर्केस्ट्रा त
अहिल्यानगर येथील गुरुवर्य कै.जोसेफ वाघमारे व संजय आठवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली फिल्मी गीत गायनाचे धडे घेतले.
 यानंतर २००० साली पुणे येथील  अशोककुमार सराफ बंधूंचा जगप्रसिद्ध आर्केस्ट्रा "मेलडी मेकर्स "मध्ये गायनाची संधी मिळाली.
या संधीचे सोने करत प्रवीण अवचर यांनी पुणे येथील नामांकित ऑर्केस्ट्रा माणिक बजाज यांचा म्युझिकल पॅराडाईज संदीप पंचवाटकर  यांचा "म्युझिक इंडिया "व मुंबई येथील वैभव पेवाल  यांचा "हिट्स ऑल  मेलाेडीज."
ऑर्केस्ट्रा मधुन  देश विदेशात हजारो कार्यक्रम केले. २०१३ मध्ये  स्वतः चे "म्युझिक कलर्स "नावाने ऑर्केस्ट्रा ची निर्मिती केली .
त्याचप्रमाणे करमाळा येथील नवसाला पावणारी देवी आई "कमला भवानी माता "यांचे गीतांचा अल्बम
स्वतः गायनासह संगीत बद्ध केला.
आजपर्यंत त्यांनी चार ते पाच मराठी गाण्यांचे स्वतःचे अल्बम तयार केलेले असून "जगावं कोणासाठी" या मराठी चित्रपटात पार्श्वगायन केले आहे . याच त्यांच्या संगीत तसेच सामाजिक क्षेत्रातील ३० वर्षाचे योगदान पाहता बालगंधर्व रंगमंदिर  परिवारातर्फे "युवा पार्श्वगायक "या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी "बालगंधर्व रंगमंदिर " परिवाराचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाचे तथा अखिल भारतीय मराठी  नाटय परिषदेचे अध्यक्ष "श्री मेघराजराजे भोसले ,व आमदार अतुल जी बेनके साहेब , यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आभिनेते मराठी बिग बॉस फेम् अभिजीत बिचुकले ,महिला आयोगाच्या तृप्ती देसाई ,चित्रपट दिग्दर्शक मेहता सर. चित्रपट अभिनेते पराग चौधरी ,वर्षाताई संगमनेरकर , शोभाताई कुलकर्णी अभिनेते जितू वायकर, अण्णासाहेब् गुंजाळ ,चित्रसेन भवर
यांच्यासह बालगंधर्व रंगमंदिर परिवारातील सदस्य ,संचालक व चित्रपट नाट्य ,संगीत कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच पुणे शहर व परिसरातील रसिक श्रोते उपस्थित होते.
यानिमित्त प्रवीण अवचर  यांना करमाळा तालुक्यातील अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या