भारतीय स्टेट बँक साकोली शाखेत केले होते आयोजन , ७० जणांचे स्वेच्छेने केले रक्तदान
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा -भारतीय स्टेट बँकेच्या राष्ट्रीय ७० व्या वर्धापन दिनानिमित्त आज ( शुक्र. २७ जून ) साकोली शाखेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी रक्तदात्यांना प्रमाणपत्रे व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. येथे ७० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले .देशातील अग्रगण्य व केंद्रीय भारतीय स्टेट बँकेच्या राष्ट्रीय ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून साकोली शाखेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला शाखा प्रबंधक मिथीला साकोरे, लेखापाल युक्ती माने, सेवाकार्य प्रबंधक माधुरी गजभिये, उपप्रबंधक श्रीकांत जनबंधू हे हजर होते. रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी लाईफलाईन ब्लड ग्रुप नागपूर, सहकर्मी भूषण बोदेले, स्वप्निल हेमणे, नरेंद्र अंबुले, भुषण सेलोकर, भास्कर सरोते, देवनाथ वाघाये, निलकंठ लांजेवार, राजू ठाकरे, सुनिल नरवले, नित्यनंद व सामाजिक कार्यकर्ता अनिल कापगते यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या