जागतिक पर्यावरण दिन (WORLD ENVIRONMENT DAY)
चंद्रपूर :-दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे. १९७३ मध्ये पहील्यांदा आयोजित करण्यात आलेल्या ते सागरी प्रदूषण, जास्त लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. जागतिक पर्यावरण दिन हा सार्वजनिक होण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे, ज्यामध्ये दरवर्षी १४३ हून अधिक देशांचा सहभाग असतो. दरवर्षी, कार्यक्रमाने व्यवसाय, गैर-सरकारी संस्था, समुदाय, सरकार आणि ख्यातनाम व्यक्तींना पर्यावरणीय कारणांचे समर्थन करण्यासाठी एक थीम आणि मंच प्रदान केला जातो.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टी बद्दल जागरूक केले जाते. ज्यांचा जगावर आणि पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे काम आहे.आपल्याला जाणीव करून देण्णाचा दिवस आहे.
प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिन एक प्रमुख थीम घेऊन येतो, ज्यात प्रमुख काॅरर्पोरेशन आणि समुदाय पर्यावरणाविषयी कारणांची तपासणी करतात. यावर्षी ५ जून २०२५ रोजी, जागतिक पर्यावरण दिन थीम "प्लास्टीक मुक्त आहे. आजच्या दिवशी म्हणजेच ५ जून रोजी जगभर पर्यावरण दिवस अगदी थाटा माटाने साजरा केला जातो. त्यादिवशी पुढील जीवनातील परिस्तिथी किती बिकट होईल ते पाहता त्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी उपक्रम करून भाषणे करून, पर्यावरणाचे वर्क शाॅप घेऊन, पोस्टर प्रदर्शनी लावुन,झाडे लावा पाणी जिरवा,असे उपक्रम राबवून पुढील धोका टाळण्याचे आज कार्य केले जाते. या सर्वांतूनच या दिवसाची जागरूकता निर्माण होते.
लक्ष्यात ठेवा: आपल्या मातेसमान पृथ्वी आहे आणि तिच्या पर्यावरणाची काळजी आपण घ्यायला पाहिजे
जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्टॉकहोम कॉन्फरन्स ऑन द ह्यूमन एन्व्हारयर्नमेंट (५ जून १९७२) येथे केली, ज्याचा परिणाम मानवी संवाद आणि पर्यावरणाच्या एकात्मतेवर झालेल्या चर्चेतून झाला होता. दोन वर्षांनंतर, १९७४ मध्ये "फक्त एक पृथ्वी" या थीमसह पहिला जागतिक पर्यावरण दिन आयोजित करण्यात आला होता.यावर्षिच्या थीम नुसार वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी
आपली संकल्पना वापरून स्लोगन,म्हणी प्रदर्शनी लावून जनजागृती केली.या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित डॉ प्रतिक दांरुडे वैद्यकीय अधिकारी, वंदना विनोद बरडे अधीसेवीका, सतिश येडे आरोग्य साहाय्यक होते.दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.हा कार्यक्रम वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी कार्यक्रमांची प्रस्तावना केली त्यात त्यांनी सद्यास्थीती व उपाय योजना पर्यावरण जनजागृती विषयी सांगितले.डाॅ प्रतीक दारूंडे वैद्यकीय अधिकारी यांनी पर्यावरण ग्लोबल परिणाम, पर्यावरण वाचविण्याचे उपाय प्रशांत सातकर अप, पर्यावरण संरक्षण फायदे प्रदिप गायकवाड अप, यांनी माहिती दिली.सुत्रसंचालन सतिश येडे यांनी केले आभार प्रदर्शन व्रुशाली देहारकर अप यांनी केले.कार्यक्रमासाठी मेहनत वंदना विनोद बरडे अधीसेवीका, हर्षा बालपांडे अप, कल्याणी कस्तुरे,कोमल टोंगे साक्षी किन्नाके, लक्ष्मीकांत ताले,कूंदा मडावी यांनी घेतली.सर्व अधिकारी व कर्मचारी आणि रुग्ण लाभार्थी यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.वंदना बरडे अधीसेवीका यांनी पर्यावरणाची शपथ दिली.
0 टिप्पण्या