चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-उपजिल्हा रुग्णालय मोर्शी अंतर्गत मोर्शी शहरातील कानफाडे विद्यालय येथे SDC कॅम्पियन अंतर्गत अतिसार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना ORS, हात धुण्याचे प्रात्यक्षिक, परिसर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा वापर, स्वच्छ परिसर, स्वच्छ अन्न, संसर्ग प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण व लसीकरणाचे महत्त्व तसेच प्रतिबंधात्मक उपचार म्हणून अतिसर स्वच्छता आणि ORS शासनाच्या स्टॉप डायरिया कॅम्पेनंतर अतिसारावर करा मात ORs ची घेऊन साथ स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याचा वापर प्रतिबंधात्मक उपचार या सर्व बाबीवर मार्गदर्शन करण्यात आले.
हा कार्यक्रम वैद्यकीय अधीक्षक मा डॉ प्रमोद पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी रुग्णालयाचे कर्मचारी विनय शेलुरे, प्रशांत बेहरे, अधिपरिचारिका जयश्री मोरे, अर्चना पवार, कल्पना पंधरे, पुष्पा पंधरे, भारती राऊत, शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक वृंद तसेच शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने हजर होते.
0 टिप्पण्या