चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-22 जून रविवार रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए जी एम ए, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) डॉक्टर सेल आयुष विभाग वतीने प्रतिष्ठेचा योगरत्न पुरस्कार भंडारा येथील महिला योग शिक्षिका मंजुषा डवले यांना मोठया थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )तेथे देण्यात आला.
या पुरस्काराला महाराष्ट्रातील योगशिक्षक योग थेरपीस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांमध्ये शिक्षण सम्राट समजल्या जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष
डॉक्टर श्री बाळासाहेब पवार साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून उपस्थित होते. सोबत पाहुण्यांमध्ये उद्योजक मनोज दांडगे साहेब उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ नितीन राजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल प्रदेश कार्याध्यक्ष (आयुष विभाग)
डॉक्टर सतीश कराळे चेअरमन आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, डॉक्टर डॉ बाबुराव कानडे अध्यक्ष आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, दिशा चव्हाण,प्रशांत सावंत, प्राध्यापक कुणाल महाजन, श्री मनोहर कानडे, व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंजुषा डवले यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे व शुभेच्छाच्या वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या