चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-"योगा मध्ये वेळेचे बंधन पाळावे,योग म्हणजे व्यायाम नाही, शरीराला निरोगी ठेवणे गरजेचे आहे.शरीरातील जैविक घड्याळा नुसार आहार,विहार,शरीर क्षमतेनुसार योग करणे,पुरेशी झोप घेणे, आपल्या जिभेवर, रागावर नियंत्रण ठेवणे,ब्रम्हांड पासून आपण पॉजिटिव एनर्जी घेतो,पॉजिटिव विचार येतात पण निगेटिव्ह विचार मनात येऊ नयेत".
जागतिक योग दिणावर संभाजी योग उद्यान येथे प्रमुख वक्ते म्हणून डॉ धनंजय गभणे (ग्रंथपाल प्रमुख_समर्थ महा.लाखनी) आपले विचार व्यक्त करीत होते.
पतंजली योग समिती छत्रपती संभाजी गार्डन भंडारा येथे आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रम प्रमुख योग शिक्षक शाम कुकडे यांचे मार्गदर्शनात सुरू असून सूत्र संचालन अतुल वर्मा यांनी तर आभार प्रदर्शन चींधुजी बूधे यांनी केले.
मोठ्या संख्येने योग साधकांची आवर्जुन उपस्थिती होती
0 टिप्पण्या