Ticker

6/recent/ticker-posts

सुप्रसिद्ध शाहीर गणेश परसराम मेश्राम यांना महाराष्ट्र रत्न गौरव सन्मान पुरस्कार जाहीर,


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -सुप्रसिद्ध शाहीर गणेश परसराम मेश्राम यांना महाराष्ट्र रत्न गौरव समाज पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.हिरकणी महिला विकास संस्था कोरेगाव भीमा द्वारा आयोजित, महाराष्ट्राची हिरकणी व समाज भूषण गौरव संमेलन पुणे  2025, सन्मान निष्ठेचा गौरव कर्तुत्वाचा वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र रत्न गौरव सन्मान पुरस्कार, लोककला खडी गंमत तमाशा, भंडारा जिल्ह्याचे सुप्रसिद्ध शाहीर गणेश परसराम मेश्राम  मु, नवेगाव पो, येरली तालुका तुमसर जिल्हा भंडारा, यांना महाराष्ट्र रत्न गौरव सन्मान पुरस्कार जाहीर झाला असून रविवार दिनांक 13/07/2025 रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथे प्रसिद्ध कलावंत व समाजसेवक यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमाचे आयोजन हिरकणी महिला विकास संस्था कोरेगाव भीमा पुणे यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या