Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद जिल्ह्यात यश संपादन करेल - अरूंधती शिरसाठ

औरंगाबाद जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
औरंगाबाद :-वंचित बहुजन आघाडी च्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती,  महानगरपालिका तालुक्यातील नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणूकी संदर्भात आज वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या तथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निरीक्षक अरूंधती शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली सुभेदारी विश्रामगृह येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते 

यावेळी बोलताना अरूंधती ताई शिरसाठ म्हणाल्या औरंगाबाद जिल्हा हा आंबेडकरी चळवळींचा बाल्ले किल्ला असून वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाल्यानंतर शहरासह जिल्ह्यात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून कार्यकर्ते यांना सत्ता प्राप्त करण्याची उत्तम संधी असून सर्वांनी एकत्रित एकजीव होऊन या निवडणुकीला सामोरे जायचे आहे या जिल्ह्यातील जवळपास सर्वच जिल्हा परिषद सर्कल पर्यंत मी स्वतः गेले आहे त्यामुळे या जिल्ह्यात यश प्राप्त करणे अवघड नाही असेही त्या म्हणाल्या,
यावेळी मार्गदर्शन करताना युवा नेते अमित भूईगळ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जागृत राहून शहरातील प्रभाग रचनेवर विशेष लक्ष ठेवून यांत राजकीय हस्तक्षेप होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही यासाठीही आपल्याला दक्ष राहावे लागेल आपल्यातील आपसातील हेवेदावे विसरून या निवडणुकीत विजय प्राप्त करण्याचा निश्चय केला
या बैठकीला युवा आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भूईगळ, प्रवक्ते तय्यब जफर, सम्यक चे प्रवक्ते बोर्डे, जिल्हाध्यक्ष योगेश बन, पुर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले,पक्षांचे लोकसभा उमेदवार माजी पक्षनेते अपसर खॉन आदींची प्रमुख उपस्थिती होती 

यावेळी जिल्हाभरातून आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना विचार मांडण्याची संधी देण्यांत आली होती वंचित बहुजन आघाडीचे पच्श्रिम जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी बाबत मत व्यक्त केले 
बैठकीचे प्रास्तावीक  पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष योगेश बन यांनी केले त्यांनी जिल्ह्यातील परिस्थिती बैठकीत विषद केली 
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, अनिल चंडालीया, रामेश्वर तायडे, बाबासाहेब वाघ, पी के दाभाडे, महासचिव मिलिंद बोर्डे, संघराज धम्मकिर्ती, संघटक बाबा पटेल, पच्श्रिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनांचे संकेत कांबळे,महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वंदना जाधव, युवा शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव, मनोज वाहुळ, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष अक्रम खान, प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, सोशल मीडिया प्रमुख प्रवीण जाधव, संपर्क प्रमुख गणेश खोतकर, सचिव सुशीलकुमार शिराळे, तालुकाध्यक्ष अंजन साळवे, खुलताबाद तालूकाध्यक्ष मुक्तार सय्यद, रामदास वाघमारे, निखिल अंभोरे, बाबासाहेब दुशिग, सुलोचना साबळे, कोमल हिवाळे, अमृतराव डोगरदिवे, प्रकाश ससाणे, राजाराम घुसाळे,पंडीतराव तुपे,एस पी मगरे, शाहीर मेघांनद जाधव,शहर महासचिव सतिश राणे,कडूबा तूपे, अरूण सोनवणे, श्रषीकेश पठारे, अंकुश पठारे, सुशांत आल्हाट, राहुल साळवे, प्रकाश वाघ,भिमा महाले, फुलंब्री तालुकाध्यक्ष सांडू श्रीखंडे,रुतिक बागुल,बुध्दभुषण साळवे, पैठण तालूकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे,अतूल गिरी,अनिल शेवाळे, पंकज गायकवाड,छबू बनकर, विष्णू विर, संतोष खोतकर,सचिन बोर्डे ,फुलंब्री तालुकाध्यक्ष सांडू श्रीखंडे,रुतिक बागुल,बुध्दभुषण साळवे, पैठण तालूकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे,अतूल गिरी,अनिल शेवाळे, पंकज गायकवाड, विष्णू विर,आदी सह शहर जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 
सुत्रसंचलन जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे यांनी केले तर आभार पच्श्रिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या