Ticker

6/recent/ticker-posts

सन्मान द्या व सन्मान द्या या सामाजिक उपक्रमांतर्गत


पत्रकार संजीव भांबोरे यांचा वाढदिवस नाममात्र, परंतु समाजातील विविध सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव व्हावा हा प्रमुख उद्देश

मुख्य संपादक दशरथ सुरडकर दैनिक माझ्या मराठवाडा राज्यस्तरीय पत्रकारिता सेवा पुरस्काराने सन्मानित

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमा अंतर्गत  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस , दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे  विदर्भ विभागीय संपादक, जनता टाईम जटा टीव्हीचे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचचे औचित्य साधून पवनी तालुक्यातील  शांतीवन बुद्ध विहार चिचाळ  ता.पवनी जि. जिल्हा भंडारा येथे ९ जून २०२५ ला सत्कार समारंभ व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात
    छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड येथील पत्रकार दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या उत्कृष्ट पत्रकारिता सेवेबद्दल राज्यस्तरीय पत्रकारिता सेवा पुरस्कार देऊन माजी खासदार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे , जनता टाईम जटा टीवी चे मुख्य संपादक निखिलेश कांबळे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर, शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध, साहित्यिक अमृत बनसोड, प्राध्यापक राजेश नंदपुरे व विविध विविध गणमान्य पाहुण्यांचे उपस्थितीत सन्मानचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र ,मानाचा फेटा, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल दैनिक माझा मराठवाड्याचे विभागीय संपादक गोकुळ सिंग राजपूत, निवासी संपादिका जयश्री सोनवणे ,कार्यकारी संपादक संजय दांडगे ,वृत्त संपादक प्रवीण तायडे व विविध पत्रकार क्षेत्रातील संघटनांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे. 
 चिन्ह सन्मानपत्रसामाजिक कार्यकर्ते पंकज वानखेडेयेथील राष्ट्रीय युवा प्रबोधनकार  सतीश सोमकुवर हे संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत गाव- खेड्यात जावून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण व आरोग्य स्वच्छता, बेटी बचाव बेटी पढाव, आजचा युवा आणि शिव फुले शाहू आंबेडकर  थोर महापुरुष  जिजाई, अहिल्याई, सावित्री, रमाई थोर माता यांच्या विचारातून आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीचे करून समाज परिवर्तनाचे कार्य अखंड पणे करीत आहे. त्यांच्या कार्याची  दखल घेत सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमा अंतर्गत व संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त  शांतीवन बुद्ध विहार येथे राष्ट्रीय युवा प्रबोधकार सतीश सोमकुवर यांना "राज्यस्तरीय कुलभूषण पुरस्कार" दशरथ सुरडकर मुख्य संपादक दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्र, माजी खासदार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ. खुशाल बोपचे, दैनिक माझ्या मराठवाड्याचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर, अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे ,जनता टाईम/ जटा टीवी चे मुख्य संपादक निखिलेश कांबळे, दैनिक माझा मराठवाडा चे कार्यकारी संपादक संजय दांडगे दैनिक माझा मराठवाडा विभागीय संपादक गोकुळ सिंग राजपूत ,शांतीवन बुद्धविहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध, भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे  विदर्भ विभागीय संपादक, जनता टाइम्स जटा टीवी चे प्रतिनिधी संजीव भांबोरे, प्राध्यापक राजेश नंदपुरे,  सामाजिक कार्यकर्ते पंकज वानखेडे पवनी यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र, मानाचा फेटा ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .त्यांच्या या सन्मानाबद्दल दैनिक माझा मराठवाडा निवासी संपादिका जयश्री सोनवणे, कार्यकारी संपादक संजय दांडगे, वृत्त संपादक प्रवीण तायडे, दैनिक माझा मराठवाडा विभागीय संपादक गोकुळ सिंग राजपूत, त्यांचे चाहते मंडळी व मित्रपरिवार ,विविध पत्रकार संघटनांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या