त्यागमूर्ती माता रमाई रडणाऱ्या नव्हत्या तर "लढणाऱ्या होत्या"
---प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रियंका उबाळे
दैनिक माझा मराठवाडा" वृत्तपत्राला दिलेली सडेतोड मुलाखत
औरंगाबाद (सिल्लोड) सध्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं करिअर घडवण्यासाठी मोठी धडपड चालू असते आणि यातच कलाक्षेत्रामध्ये आपल्या गुणवत्तेला उगवण्यासाठी फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या युवक युवती या सध्या पुढे येत आहे.
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातून आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी खऱ्या जीवन प्रवासातील कलाक्षेत्राला सुरुवात करणाऱ्या आपल्या परिस्थितीवर मात करून या कलाक्षेत्रात संघर्षातून पदार्पण करून "मी रमाई" या एकपात्री नाटकामुळे समाजाच्या काळजावर घर करणाऱ्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रियंका उबाळे यांचा हा खडतर दिवस प्रवास रेखाटण्यात आलेला आहे.
अभिनेत्री प्रियंका उबाळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागात पोस्ट ग्रॅज्यूएनचे तिने शिक्षण घेतले असून सध्या अभिनेत्री प्रियंका उबाळे
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धांगिनी त्यागमूर्ती माता रमाई यांचा इतिहास खऱ्या अर्थाने समाजासमोर पोहोचावा म्हणून त्यांनी "मी रमाई" या एकपात्री नाटकाचा प्रयोग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात करून त्यागमूर्ती माता रमाईची छबी व त्यांचे जीवन कार्य हुबीहुब आपल्या कलात्मक गुणाने करुन माता रमाई घराघरात पोहोचवण्याचे काम या धाडसी व समाजासाठी वाहून घेतलेल्या अभिनेत्री प्रियंका उबाळे यांनी केले आहे
"मी रमाई" त्या नाटकाला संपूर्ण महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर चळवळीतच नव्हे तर इतर समाजाकडून सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
अभिनेत्री प्रियंका उबाळे यांनी "दैनिक माझा मराठवाडा" वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, ग्रामीण भागात जीवन जगत असताना कलेची आवड असताना सुद्धा मुंबईसारख्या शहरात चित्रपट सृष्टीत असो किंवा कलाक्षेत्र असो या ठिकाणी ग्रामीण भागातल्या कलाकाराला काम मिळणे अवघडच व आव्हानात्मक असते त्या सर्व गोष्टीवर मी मात करून आज खऱ्या अर्थाने "मी रमाई" या नाटकाच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या घराघरात व फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनामनात मी आज पोहोचलेली आहे हाच मला समाजाचा सार्थ अभिमान आहे असेही "मी रमाई" या एकपात्री नाटिकेच्या नायिका प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रियंका उबाळे हिने दैनिक माझ्या मराठवाड्याची बोलताना सांगितले आहे.
अभिनेत्री प्रियंका उबाळे यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनेत्री म्हणुन (गोल्ड मेडल) मिळाले आहेत. त्याचबरोबर प्रियांकाला मी रमाई हे एकपात्री नाटक पाहून हळूहळू वेगवेगळ्या चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी सुद्धा मिळाली आहे.
अभिनेत्री प्रियंका उबाळे यांनी आतापर्यंत
बाबो - दिग्दर्शन रमेश चौधरी प्रदर्शित ३१ में २०२८ ,
प्रेमवारी - दिग्दर्शक राजेंद्र गायकवाड प्रदर्शित ०८ फेब्रू.२०१८ ) ,
डिलिव्हरी बॉय - दिग्दर्शक मोसिन खान प्रदर्शित- 9 फेब्रू.२०२४ ,
आम्ही जरांगे - दिग्दर्शक - योगेश भोसले प्रदर्शित - 5 जुलै २०२४ , जय भीम पॅंथर - दिग्दर्शक निशांत धापसे लवकरच आपल्या भेटीला एप्रिल २०२५ , चित्रपटाची निर्मिती केलेली आहे.
या चित्रपटात अभिनेत्री प्रियंका उबाळे घेणे महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रियंका मुलाखत देताना म्हणते की मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या बद्दल खूप आकर्षण होत.. म्हणून मी विद्यार्थी दशेतच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी" रमाई" यांचा विषय हाती घेतला. व सन २०१५ मध्ये स्वखर्चातून"साहेब आणि रमाई" या नाटकाची स्वतः निर्मिती केली.
अभिनेत्री प्रियंका उबाळे यांनी पुढे मुलाखत देताना सांगितले की ह्या नाटकाच्या अनुभवात माझ्या लक्षात आले की, आज पर्यंत त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची एक बाजू समाजाच्या समोर आली. ती बाजू म्हणजे रमाई फक्त रडतांना दुःखी ,कष्टी, फाटक्या लुगड्यातली, शेणाच्या गोव-या वेचणारी, एक कमजोर स्त्री म्हणून रमाईकडे आजही पाहिल्या जात...आणि रमाईची कणखर बाजू कायम दुर्लक्षित राहिली हे माझ्या लक्षात आले आणि मग मी संशोधन केलें व धाडसी रमाई जगासमोर घेवून येण्याचा निर्णय घेतला... आता येणाऱ्या पिढीला"रडणाऱ्या नाही तर लढणाऱ्या"रमाईचा इतिहास सांगावे हि आपली जवाबदारी आहे.. माझ्या डोक्यात एक संकल्पना आली..मला वाटले रमाईच्या जिवनावर भव्य दिव्य चित्रपट तयार करावा पण चित्रपटासाठी लागणार आर्थिक पाठबळ उभा करण्यास मी असमर्थ ठरले…सामाजिक बांधिलकी जपणारा एकही मदतीचा हात पुढें आला नाही ..चांगले वाईट अनुभव घेऊन मग मी ठरवलं जे करायचं ते स्वतःच्या हिंमतीवर मग ३ वर्ष मी चित्रपटात काम केले…मला मानधन म्हणून मिळालेल्या रक्कमेतून मी हळूहळू पैसे साठवू लागले…कष्ट करुन एक एक रुपया जमा केला.. व नाईलाजास्तव"मी रमाई"एकपात्री शॉर्ट फिल्म तयार केली... व प्रबोधनाच्या माध्यमातून प्रत्येक बौद्ध विहारात / धम्मपरिषदेत स्वतः जाऊन लोकांना एकत्र करून प्रोजेक्टर द्वारे मी रमाई" हा चित्रपट व रमाई यांच्या आयुष्यावर व्याख्यान सुरू केले २५० पेक्षा जास्त बौद्ध विहारात मी चित्रपट दाखवला. धाडसी रमाई माझ्या ह्या संकल्पनेला समाजाच प्रचंड प्रेम मिळायला लागले..माझी लोकप्रियता वाढायला लागली आणि धाडसी रमाई हळूहळू घराघरा पोहोचायला लागली .
अशी मुलाखतीदरम्यान सांगितले
प्रियंका पुढे बोलताना म्हणाली की, BBC सारख्या नॅशनल न्यूज चॅनलने माझ्या कार्याची दखल घेतली…आता प्रेक्षकांच्या आग्रहास्तव"मी रमाई"ह्या एकपात्री नाटकाची निर्मिती केली.दिल्लीतील रंगमंचावर सादर नाटकाचे सादरीकरण केले..संपूर्ण महाराष्ट्रात या एकपात्री नाटकाचे हाऊसफुल प्रयोग होतं आहे….धाडसी रमाई घराघरात पोहोचवण्यासाठी मदतीचे हात पुढे आले तरच माझा प्रयत्न यशस्वी होईल…मला महाराष्ट्रालाच नाही तर अख्या जगाला क्रांतिकारी रमाईची ओळख करून द्यायची आहे त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत....तुमची साथ मिळाली तर रमाईच्या कार्याला मोलाची साथ मिळेल
अशा प्रकारची सडेतोड मुलाखत प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका उबाळे हिने दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राला दिली आहे.
वृत्त संकलन- भैय्यासाहेब सुरडकर ,(सिल्लोड) औरंगाबाद 7666849699
0 टिप्पण्या