Ticker

6/recent/ticker-posts

हयातनगर पाटी जवळ थरारक घटना..


धारदार शस्त्राने थोरावा येथील 22 वर्षीय तरुणाची हत्या; तर एकाची प्रकृती चिंताजनक..

सर्व थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात मध्ये कैद
 
प्रतिनिधी - श्रीकांत बारहाते

 हिंगोली :-वसमत तालुक्यातील हयातनगर पाटीजवळ एका हॉटेल बार रेस्टॉरंट मध्ये बसलेल्या दोघांना धारदार खंजीरने भोसकल्याची सदरील घटना ही मंगळवार दिनांक 24 जुनच्या रात्री साधारण नऊ ते साडेनऊ   वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे.

 तर यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह हट्टा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली गेली आहे, या प्रकरणातील फरारी आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक केल्याची माहीती यावेळी प्राप्त झाली आहे. दरम्यान हट्टा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील थोरावा येथील विशाल मुंजाजी देवरे वय वर्षे  २२ व त्याचा मित्र ओमकार नरवाडे याच्या सोबत मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हयातनगर पाटीजवळील एका हॉटेलमध्ये बसले होते.

तर यावेळी थोरावा येथीलच गोपाळ देवरे, ऋषीकेश कदम, व शिवाजी देवरे हे तिघे आले. तर यामध्ये दोघांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून तेथे बसलेल्या विशाल व ओमकार याच्यावर खंजीरने सपासप वार करण्यास सुरवात केली.

दरम्यान,अचानक झालेल्या या हल्यामुळे दोघेही प्रतिकार करू शकले नाही. यामध्ये विशाल याच्या पोटावर व छातीवर धारदार शस्त्राचे वार बसले तर ओमकार याच्याही पोटावर वार बसले. त्यानंतर मारहाण करून तेथुन तिघेही जण पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार ताम्रध्वज कासले, श्री सुर्यवंशी, श्री सुरेशे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी विशाल व ओमकार यांना उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र विशाल याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. तर गंभीर जखमी असलेल्या ओमकार याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तर बुधवारी सकाळी आदिनाथ मुंजाजी देवरे यांच्या फिर्यादीवरुन ऋषिकेश कदम, गोपाळ देवरे, शिवाजी देवरे यांच्या विरुद्ध हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेतील फरार आरोपींच्या शोधासाठी हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांनी तीन पथके रवाना केली होती. आत्ता हाती आलेल्या माहीती नुसार त्यात तिघांचाही कसून चौकशी व शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यात आल्याची माहीती यावेळी प्राप्त झाली आहे. 

सदरची घटना प्रेम प्रकरणाच्या कारणावरून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून आता आरोपींच्या अटके नंतरच सर्व प्रकार उघड होणार असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या