मिलिंद गायकवाड उपसंपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र मो 9860179256
धाराशिव: - तुळजापूर तालुक्यातील अणदुर वसला नगर येथील प्राथमिक शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका दराडे मॅडम आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करताना शाळेच्या मुख्याध्यापिका दराडे मॅडम म्हणाल्या की, महात्मा फुले यांच्या हंटर कमिशनची तंतोतंत अंमलबजावणी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले, त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं असावा म्हणून पालकांना आपले मुले जर शाळेत पाठवायचे नसेल तर १ रुपया दंड भरावा लागेल असा आदेश काढून, त्यावेळी वंचित समूहाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केले.म्हणुणचं आज आपण शिक्षण घेऊन मोठमोठे हुद्द्यावर नोकऱ्या करीत आहोत. जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, याचे सर्वश्रेय राजर्षी शाहू महाराजांना जाते , आपली सत्ता खऱ्या अर्थाने अपेक्षित वंचित समाजासाठी वापराणारा, लोकराजा असं त्या म्हणाल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते आर एस गायकवाड (पत्रकार) सुभाष स्वामी सर, बाबुराव पांचाळ सर, भीमराव घोडके सर, श्रीमती वैशाली आडम मॅडम, विवेकानंद खलाटे सर या कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक अंगणवाडी कर्मचारी बोगंरगे मॅडम कांबळे मॅडम बालक, उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरी सर यांनी केले आणि आभार शिवदास भागवत सर यांनी मानले.
0 टिप्पण्या