Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश फॉर्म ऑफलाइन स्वीकारा - वंचित बहुजन आघाडीची मागणी!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकोला : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नुकतेच या वर्षांमध्ये ग्रामीण भागात अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने सुरू केली असून त्याची मुदत ५ जून २०२५ रोजी संपत आहे. आज रोजी या ऑनलाइन चुकीच्या पद्धतीमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे पालकांना फार मोठा त्रास होत आहे. वेबसाईड बंद किंवा नेटवर्क उपलब्ध नसणे इत्यादी तक्रारी विद्यार्थ्यांकडून येत आहेत. कॉम्प्युटर सेंटरवर मोठ्या प्रमाणावर लाईन लागले असून मोठ्या प्रमाणामध्ये या विद्यार्थ्यांकडून पैसा वसूल केला जात आहे.

मागच्यावर्षी ग्रामीण भागामध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेश दिल्या जात होते. ती पद्धत यावर्षी सुद्धा कायम ठेवण्यात यावी. ऑनलाइन पद्धती बाबत  विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार आजही अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अपूर्ण आहे व ५ जून २०२५ तारीख ही शेवटची शासनाने दिलेली आहे, परंतु ग्रामीण भागातील आदिवासी भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या जवळ मोबाईल नसल्यामुळे OTP पण देण्याची अडचण अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेताना येत आहे, म्हणून शासनाने ग्रामीण भागाकरिता ऑनलाइन व ऑफलाइन दोन्हीही आणि शहरी भागाकरिता ऑनलाइन व ऑफलाइन पद्धत प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी व २० जूनपर्यंत किमान पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी शिक्षणमंत्र्याकडे वंचित बहुजन आघाडी मुर्तीजापुर, बार्शीटाकळी, तेल्हारा, अकोट, पातुर, बाळापूर तालुका कार्यकारणीकडून तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.

अकोला तालुक्याच्यावतीने उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शिक्षण मंत्री यांनाही निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल हा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या