Ticker

6/recent/ticker-posts

साकोली -शेंदूरवाफा नगर परिषदेतील सर्व नाल्या व केर कचरा साफ करा :-वंचित बहुजन आघाडीचे मागनी


 साकोली येथील सी  ओ यांना निवेदन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -सध्या पावसाचे दिवस आहेत पावसाळा सुरू होत आहे त्यामुळे साकोली -शेंदूरवाफा येथील  ज्या गटारे नाल्या आहेत त्या अजून  स्वच्छ झालेले नाहीत. नाल्यावरील फरच्या फुटलेले आहेत .नाल्यामध्ये केरकचरा साठलेला आहे, पाणी तलावापर्यंत सुरळीत जात नाही .रस्त्यावर मलंदा ठेवलेला आहे ,मटेरियल  ठेवलेला आहे, त्यामुळे लोकांना त्रास होतो. नगरपरिषदेतील शेंदुरवाफा ,साकोली येथील नगरपरिषदेने सर्वच्या सर्वच वार्डातील नाल्या साफ कराव्यात.व केरकरचा काढण्यात यावा, फुटलेल्या परश्या दुरुस्त करण्यात यावा ,अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलन करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आलेला आहे. निवेदन मधून देण्यात आलेला आहे. याचा प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे डी जी रंगारी, महिला जिल्हा अध्यक्षा तनुजा नागदेवे, वंचित तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी,महिला तालुकाध्यक्ष शितल नागदेवे, यादवराव गणवीर ,गणेश गजभिये, मोरेश्वर राऊत ,अमित नागदेवे, जिजा कोल्हे, सविता वालदे,कोकिळा रामटेके, गीता वलथरे, बबीता राऊत व इतर कार्यकर्ते  याप्रसंगी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या