चित्रा न्युज प्रतिनिधी
अकोला : न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असुन जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका व नगर पंचायतच्या प्रारुप सर्कल रचना व प्रारुप प्रभाग रचना संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने निवडणूक पुर्व तयारी संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात स्थानिक विश्रामगृह अकोला येथे महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीला वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरूंधतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे यांच्यासह महिला आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व सर्कल पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या