चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-गत १५ दिवसापासून पावसाने तोंड लपविले आहे. माञ,मे मध्ये सलग १५ दिवस पडलेल्या पावसामुळे तसेच ८,९ व जुन रोजी पडलेल्या पावसामुळे जमिनीत बरीच ओल तयार झाली होती. म्हणुन उघाड देताच बहूतांश शेतक-यांनी मुग,उडीद,कापुस, तुर,तीळ,ज्वारी आदी पिकांची पेरणी केली.व हा जुगार खेळला. या जुगारात म्हणजे पेरणीत सर्वाधिक क्षेञावर म्हणजे आजवर पेरणी केलेल्या क्षेञापैकी १९४३६ इतक्या क्षेञावर सोयाबीन पेरल्याचे शेतकी विभागाकडे असलेल्या नोंदीवरुन तसेच बाजारात सोयाबीनला उच्च दर मिळत नसलातरीही सोयाबीन हेच यंदाही एक्का असल्याचे सिध्द झाले आहे.आणि आता गरज आहे.ती दमदार पावसाची.आणि एकदा का पाऊस पडला की,मग बाकीचे शेतकरीबांधव पण पेरणी करणार, यात शंका नाही.
उदगीर तालुक्याचे एकुण भौगोलिक क्षेञ ७७८८६ आहे.तसेच सरासरी पेरणीचे एकुण क्षेञ ६६८८७ आहे. उदगीर सह तालुक्यात असलेल्या ८ महसुल मंडळात आतापर्यंत पेरणीचे एकुण क्षेञापैकी २७२८८.५ हेक्टर क्षेञावर पेरणी झाल्याचे समजते. तसेच ४०.०८ टक्के पेरण्या उदगीर तालुक्यात झाल्या आहेत.आणि हाळी-हंडरगुळी परिसर ज्या महसुल मंडळाशी अटॅच आहे,त्या वाढवणा मंडळात आतापर्यंत एकुण पेरणी क्षेञापैकी ५०५८ क्षेञावर पेरणी झाली.पेरणीची टक्केवारी ६४.५६ इतकी आहे.अशी माहिती उदगीर तालुका शेतकी अधिकारी *संजय* *नाबदे* यांनी दिली आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की,यंदा उन्हाळ्यात पावसाळा आणि आता पावसाळ्यात उन्हाळा ! असे अजब-गजब हवामान बघायला मिळाले व मिळत आहे.
असे असलेतरी ही यंदा आतापर्यंत उदगीर तालुक्यात असलेल्या एकुण पेरणी क्षेञापैकी २७२८८.५ क्षेञावर पेरणी झाली आहे.आणि सोयाबीन १९४३६ हे.क्षेञावर पेरले असून ४०. ०८ % पेरण्या झाल्या आहेत.तसेच वाढवणा मंडळात आता पर्यंत ६४ % पेरण्या झाल्या आहेत.
0 टिप्पण्या