(संभाजी योग उद्यान येथे जागतिक योग दिनाचे शुभारंभ)
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-जागतिक योग दिना निमित्त पतंजली योग समिती (छत्रपती संभाजी राजे योग उद्यान) राजीव गांधी चौक भंडारा द्वारा जागतिक योग दिवस चे ७ दिवसीय( १५ ते२१ जून २०२५) योग शिबिराचे भव्य आयोजन निमित्त नुकतेच उद्घाटन पार पडले. या प्रसंगी उद्घाटक आमदार मा.श्री नरेंद भोंडेकर(सपरिवार),शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मा.श्री अनिल गायघने(सपरिवार), मा. डॉ.अश्विनीताई भोंडेकर, योग शिक्षिका डॉ अश्विनी व्यवहारे,प्रमुख योग शिक्षक योगव्रत्ती मां.श्री शाम कुकडे,माजी नगराध्यक्ष मां.रामदास शहारे गुरुजी, महादेव बांगडकर,उद्धव डोरले,रुपेश टांगले,बाबुराव डोये, सदानंद इलमे, सईद शेख,अतुल वर्मा, अर्बन बँक चे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश मदान,उद्योजक अरविंद गुप्ता,शिवचरण राऊत, ई मान्यवर पाहुणे उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवर पाहुणे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पश्चात पुष्पगुच्छ देवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.प्रास्ताविक श्री शाम कुकडे यांनी करून येथील निसर्ग रमणीय परिसरात सकाळ पासून ऑक्सीजन घेणे हेच खरे औषध आहे असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी उद्घाटक श्री नरेंद्र भोंडेकर यांनी "या योग धामात मला योग गुरूं व योग साधकांनी जो सन्मान दिला तो माझ्या करिता खूप मोठे सन्मान आहे. असे प्रतिपादन करून येथे योगसाधका साठी सुंदर असे योगधाम ची नवीन वास्तू बांधून देवू असे आश्वासन देत या बद्दल आपली प्रतिबद्धता जाहीर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित डॉ.अश्विनी व्यवहारे यांनी योगाचे महत्त्व विशद करून "घराघरातून योगाला पोहोचविण्याचे कार्य करणे गरजेचे आहे",असे प्रतिपादन केले.
महादेव बांगडकर,बाबुराव डोये, उद्धव डोरले,रामदास शहारे,रुपेश टांगले,सईद शेख ई नी ही मार्गदर्शन केले.सूत्र संचालन अतुल वर्मा यांनी केले तर आभार पुरुषोत्तम वैद्य यांनी मानले.
शिबिरात आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारे जाहीर सामान्य योग अभ्यासक्रम(प्रोटोकॉल) प्रमाणे अष्टांग योग,मुद्राबंध, एक्यूप्रेशर,निसर्गोपचार,षटकर्म क्रिया, सूर्य नमस्कार, ई बाबत प्रमुख योगशिक्षक श्री शाम कुकडे पतंजली योग समिती जी.भंडारा तथा इतर योग तज्ञा कडून निशुल्क मार्गदर्शन करण्यात येत आहे.कार्यक्रम पश्चात सर्वांनी फराळ व नाश्त्याच्या आस्वाद घेतला. मोठ्या संख्येने योग साधकांची, विशेषतः महिला योगसाधकांची ही आवर्जुन उपस्थिती होती.शिबिरांची सांगता २१ जून रोजी होईल .या अवधी मध्ये अनेक तज्ञां चे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे करिता जास्त संख्येने नागरिकांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या