Ticker

6/recent/ticker-posts

इनरव्हील क्लब भद्रावती तर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप ...


चित्रा न्युज प्रतिनिधी 

भद्रावती : सामाजिक कार्यात अग्रेसर असनारी सामाजिक संस्था इनरव्हील क्लब भद्रावती तर्फे १९ जुलै ला जिल्हा परीषद प्राथमिक शाळा भद्रावती येथिल चाळीस गरजु विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करन्यात आले.शिक्षणाबद्धल विद्यार्थ्यांमधे आवड निर्माण करने , हा इनरव्हील क्लबचा उद्देश आहे .
शिक्षणाची सुरुवात ही योग्य शिक्षण साधनसामुग्री पासुन होते,याची जाणिव ठेवुन हा उपक्रम हाती घेन्यात आला होता. स्कूल बॅग वाटप नंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व त्यांच्या डोळ्यातील चमक हेच या उपक्रमाचं यश ठरलं.
  हा उपक्रम यशस्वी करन्यासाठी 
इनरव्हील क्लबच्या नवनियुक्त अध्यक्षा- सौ.मनिषा ढोमणे, सचिव - सौ.तृप्ती हिरादेवे, कोषाध्यक्षा- सौ. रश्मी विक्रांत बिसेन,ISO - सौ.वर्षा धानोरकर, सदस्य - वंदना धानोरकर,डाॅ.माला प्रेमचंद, किर्ति गोहणे,प्रेमा पोटदुखे,स्वाती चारी, पुजा महाजन,स्वरुपा पाटिल, शुभांगी बोरकुटे,प्रियंका कुंभारे, राजश्री बतीनवार,नेत्रा ईंगुलवार, निरुपा भालोडीया, प्रतिभा मानकर, मनिषा फुले व संपूर्ण सदस्यांनी पुढाकार घेतला.
शाळेच्या मुख्याध्यापिका- शशिकला तुमराम, शिक्षिका - शारदा गुरले व सहकाऱ्यांनी क्लबचे मन:पुर्वक आभार मानले व भविष्यातही असेच सहकार्य मिळो अशी अपेक्षा व्यक्त केली .
 इनरव्हील क्लब भद्रावती नेहमीच सामाजिक उपक्रम राबविणार असुन शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडविन्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे क्लब तर्फे कळविन्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या