चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : कावळा करतो काव काव....!! माणसा माणसा झाडे लाव...!!! उन्हा तान्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलोपावली!!
असा वृक्षसंवर्धनाचा संदेश देत
तसेच वृक्ष हि काळाची गरज हा मूलमंत्र देत ,वृक्ष हे पर्यावरनिय समतोलपणा राखून प्रदूषण कमी करतात, वृक्षामुळेच आपल्याला निरोगी व आनंदी जीवन जगता येते असे वृक्षारोपणाचे महत्व पटवून देत दिनांक.२३ रोज मंगळवारला गवराळा वॉर्ड भद्रावती येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका वनिता कोरडे, शिक्षिका शुभेच्छा साठे, व शाळेतील शिक्षिका तसेच शाळा सुधार समितीचे अध्यक्ष दिपक पोटे यांचे प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.माझी शाळा सुंदर शाळा असे नारे देत आरोही खडसे, स्वरा सोनटक्के, प्राची मिटपल्लीवार, सम्यक खैरे, दुर्वा गेडाम, या वर्ग ६ वी च्या चिमुकल्या विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षारोपण करून शाळा परिसर व आवार सुंदर व रमणीय करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणूसमारे, पालक प्रेम पलगंट्टीवार, शाहरुख पठाण, दिपाली झिंगरे, आदी नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या