उपविभागीय अधिकारी शहादा यांना निवेदन; कारवाईसाठी १ दिवसाची मुदतीचे आश्वासन!
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :- खैरवे-भडगांव येथील आदिवासी पुरूष व महिला ग्रामस्थांना वाईट वाईट शिवीगाळ करून बेदम मारहाण करणा-या ,अन्याय अत्याचार करणा-या,सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणा-या, गावाची शांतता,कायदा व सुव्यवस्था बिघडवणा-या वादग्रस्त पोलीस पाटील श्री.धनराज उत्तम पानपाटील यांना चौकशी अहवालाच्या आधारे तात्काळ पदावरून हटवा व त्यांच्या जागी सन्माननीय व विश्वसनीय अन्य व्यक्तीची पोलीस पाटील पदी नेमणूक करा.या मागणीसाठी दिनांक २४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर आदिवासी संघटनांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी,शहादा यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.उपविभागीय अधिकारी शहादा यांनी १ दिवसाची मुदत मागत उद्या लेखी स्वरूपात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.प्रांत अधिकारी यांनी आम्हाला ८ दिवसांत कारवाई करतो,म्हणून खोटे बोलले.चौकशी अहवाल येवून १५ दिवस झाले तरी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. आय ए एस अधिकारी आदिवासींना न्याय देणार नाही तर कोण न्याय देणार? कोणताच अधिकारी आदिवासी लोकांना न्याय देत नाहीत.आप झूठ मत बोलो, म्हणत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी प्रांत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आमच्या एकाही निवेदनाची दखल तुम्ही घेतली नाही,असे म्हणत भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.
यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,आदिवासी क्रांती दलचे उपाध्यक्ष रमेश भील, सुनील भील,भु-या भील, छाया भील,आशा भील,ताईबाई भील,दिपक भील,सुभाष भील, संजय भील, रंजीत भील,दिपक भील, राहूल भील आदि असंख्य महिला व पुरूष कार्यकर्ते उपस्थित होते.
खैरवे-भडगांव येथील पोलीस पाटील ला पदावरून हटवा,नही चलेगी नही चलेगी,गुंडगिरी नही चलेगी,दबंगगिरी नही चलेगी,अशा जोरदार घोषणा आंदोलकांनी दिल्या.
0 टिप्पण्या