Ticker

6/recent/ticker-posts

गोसेवा हरित सेवा उपक्रम २०२५ संपन्न

!गावो विश्वस्य मातरः
गौ सेवा परमो धर्मः!

वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ।।१।।
तेणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ।।२।।

चित्रा न्युज प्रतिनिधी 
यवतमाळ :-माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महा एनजीओ फेडरेशन व स्व.मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता.पुसद जि.यवतमाळ तर्फे एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला — "गोसेवा हरित सेवा उपक्रम".

या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ५५ सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या सहभागी संस्थानी मोठ्या प्रमाणात गोशाळेमध्ये वृक्षारोपणाचे कार्य केले. गोशाळांमध्ये वृक्षारोपण, म्हणजेच पर्यावरण संवर्धन आणि गोसेवेचा सुंदर संगम संपन्न!

या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे गोशाळांच्या परिसरात हरित आवरण वाढवून गोमातेच्या निवासस्थानी हरित नैसर्गिक वातावरण निर्माण करणे. झाडांमुळे सावली, थंडावा आणि प्रदूषणमुक्त हवा मिळून गोमातेच्या आरोग्याचे संरक्षण होते. पर्यावरण रक्षण आणि गोसेवा यांचा समतोल साधत, समाजात शुद्ध देशी गोवंशाचे महत्त्व अधोरेखित करणे हेही या उपक्रमाचे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शुद्ध देशी गोवंश हा आपल्या सांस्कृतिक, कृषी आणि आरोग्यविषयक जीवनशैलीचा अविभाज्य भाग असून, त्याचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी जनजागृती करणे ही काळाची गरज आहे.

या उपक्रमामुळे ना फक्त झाडे लावली गेली, तर समाजसेवेचा एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. गोसेवा आणि पर्यावरण रक्षण या दोन थोर कार्यांना एकत्र आणून महा एनजीओ फेडरेशन व स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता.पुसद जि. यवतमाळ यांनी एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. 
गोपाल कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आसोली ता. पुसद जि. यवतमाळ, धर्मगुरू डॉक्टर संत श्री रामराव महाराज गोरक्षण त्रस्त देवतांडा पुसद जि. यवतमाळ, श्री.श्री.महर्षी मातंग ऋषी आश्रम नंदलाल गोरक्षण कासोळा ता. पुसद जि. यवतमाळ व इतर गोशाळा मधे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला, कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भगत, रवींद्र धवसे, प्रशांत भगत, नितीन भगत, व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या