विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड -विष्णुपुरी भागातील नदीपात्रातून वाळू उपसा बर्याच दिवसांपासून सुरू आहे, महसूल विभाग गाढ झोपेत असतो पोलिस विभाग जागा असुन झोपेचं सोंग आणतो कारण हप्ता वसुली केलेली असते वाळू उपसा चालू असताना बघुन डोळे मिटून घ्यावे लागतात महसुल विभाग असो किंवा पोलिस विभाग,हे आपलं उखळ पांढरं करण्यावर च असतात म्हणून तर वाळू माफिया चा जोर वाढत आहे, पोलिस अधीक्षक अविनाश कुमार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
यांचा दबाव प्रशासकीय यंत्रणा वर आला तर हे लोक थातुरमातुर कारवाई करण्याची जोरदार तयारी सुरू करताना दिसतात तस बघीतल तर आज ची परिस्थिती जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांचा वाळू माफिया वर दबदबा निर्माण झाला आहे,हे लोक खालचे अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून आपली पोळी भाजत आहेत, आणि हे अधिकारी, कर्मचारी आपले खिसे गरम करतं आहेत कारण एकच या लोकांना माहिती आहे आपल्या वर बारकाईने लक्ष कोणी ठेवत नाही, वाळू माफिया वर पकडून कारवाई करण म्हणजे जीवाला धोका आजची परिस्थिती हि आहे एक तर मनी मनी वर पाणी सोडायच
, आणि जीव धोक्यात घालायचा हे रिक्स कोण घेणार मिडिया वाले बातमी लावायची हिम्मत करत नाहीत केली तर हे माफिया लोक धमकी देत हमला ही करतात कित्येक जनावर मारहाण झाली आहे, तरी विष्णुपुरी येथील नदीपात्रातून वाळू उपसा चालूं आहे या कडे प्रशासन लक्ष देणार का?
0 टिप्पण्या