Ticker

6/recent/ticker-posts

मन व चित्ताला नियंत्रणात ठेवण्याची प्रचंड शक्ती योग मध्ये -डॉ.प्रकाश मालगावे


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-"मन व चित्ताला,नियंत्रणात ठेवण्याची प्रचंड शक्ती योग शास्त्रा मध्ये आहे.भारतीय विचारधना मध्ये वेद,उपनिषद,धर्मशास्त्र या मध्ये आयुष्याला चांगले वळण देण्याचे मार्ग आहे.त्यातून योग या या शास्त्रातून अभ्यास केला पाहिजे.योग रोगमुक्त जीवनाचे मंत्र आहे असे प्रतिपादन डॉ प्रकाश मालगावे यांनी केले.ते पतंजली योग समिती (मिस्कींन गार्डन)द्वारे  छत्रपति संभाजी महाराज योग उद्यान ( भंडारा) येथे जागतिक योग दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते मार्गदर्शन करीत होते. या प्रसंगी प्रमुख योग शिक्षक शाम कुकडे,महादेव बांगळकर, डॉ.बाळकृष्ण सार्वे ,उध्दव डोरले,मंगेश वंजारी,सदानंद इलमे,हरीश मदान,सईद भाई शेख,गायत्री परिवार चे सह समन्वयक राजीव शक्करवांर ,वन विभागाचे सहा वनसंरक्षक संजय मेंढे ई.मान्यवर पाहुणे प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरवातीला पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.प्रास्ताविक श्री शाम कुकडे यांनी केले.
सर्व मान्यवर पाहुण्यांनी ही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन अतुल वर्मा यांनी  तर आभार प्रदर्शन कॉ.हिवराज उके यांनी केले. दि.१५ जून ते २१ जून पर्यंत शिबिरात आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारे जाहीर केलेल्या सामान्य योग अभ्यासक्रम (प्रोटोकॉल) प्रमाणे अष्टांग योग, मुद्राबंध, एक्युप्रेशर,निसर्गोपचार, षटकर्म क्रिया, सूर्य नमस्कार, ई बाबद पतंजली योग समिती चे प्रमुख  योग शिक्षक श्री शाम कुकडे  तथा इतर योग तज्ञा कडून मार्गदर्शन करण्यात आले आहेत.या मध्ये शाम कुकडे यांनी योग प्राणायाम प्रशिक्षण, डॉ रत्नाकर बांडेबुचे यांनी योग,मानसिक रोग व उपचार, डॉ संजय मानकर यांनी योगासोबत आहार संहिता, डॉ अनिल निकुळे यांनी वृध्छावस्थाजन्य पोटविकार_कारण,लक्षण,अवस्था व उपचार वर डॉ रेणुका तिवारी यांनी आहार व दिनचर्या आणि डॉ धनंजय गभणे मुख्य ग्रंथपाल (समर्थ महा.लाखनी ) यांनी योग आणि मानवी शरीर ई वर मोलाचे मार्गदर्शन केले. ज्यातून या कालावधीत अनेक योग साधक, सांधिकानी लाभ घेतला.जागतिक योग दिंनावर मोठ्या प्रमाणात योग साधक,साधिकांची उपस्थिती होती.राजेशकुमार धूत यांनी नाश्त्याची व्यवस्था करून दिली,कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनेक सहयोगी,आश्रय दात्यांनी आणि समिती चे पुरुषोत्तम साकुरे,संजय मोहतुरे,अतुल वर्मा,आत्माराम बेदरकर,पुरुषोत्तम वैद्य,प्रभू मडावी,शिवराम बारई ई नी सहकार्य केले.
"*मा.जिल्हा प्रतिनिधी/वार्ताहर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या