चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर-वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ विराजमान होते. नाईक यांचा जन्म पुसद जवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी झाला. वसंतराव नाईक हरितक्रांती , पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात.कृषीसंस्कृतीचा पुनर्रूत्थान करीत वसंतराव नाईकांनी देशभरात नावलौकिक मिळविला. आधुनिक भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचा त्यांनी मान उंचाविला. प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी 'आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत' या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दूरगामी योजना राबवल्या. महानायक वसंतराव नाईक यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीच जाणीव नव्हती तर, दूरगामी स्वरुपाच्या उपाययोजना सुद्धा त्यांनी केल्या. शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांची नाळ कायम जुळलेली होती. कठीण काळातही क्रांतीकारी कार्य नाईकांनी केले. त्यामुळे त्यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणून संबोधतात. माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला.महानायक वसंतराव नाईक हे एक नाव नसून शाश्वत विकासाची लोकाभिमुख विचारधारा आहे.नाईक घराणे हे भारतीय समाजकारण व राजकारणातील एक प्रचलित घराणे आहे. 'स्वराज्याची पंढरी' म्हणून ओळख असलेल्या पुसद मतदारसंघावर इ. स. १९५२ पासून नाईक घराण्यानी निर्विवाद विजय संपादन केले आहे. ते गौरराजवंशी असून त्यांचे गोत्र रणसोत क्षत्रिय आहे. गहुली हे खेडे गोरराजवंशी चतुरसिंग नाईक रणसोत यांनी वसविले होते. अखिल बंजारा समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. त्यामुळे ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजे पुढारी झाले व त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंग नाईकांचा मुलगा फुलसिंग नाईक हा पुढे बहुजन समाजाचा 'नाईक' झाला. त्यांची पत्नी हुनकीबाई यांना दोन मुले झाली. राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले. नाईक घराण्यानी महाराष्ट्राला दोन यशस्वी मुख्यमंत्री दिलेत. अविनाश नाईक, मनोहरराव नाईक व इंद्रनील मनोहर नाईक यांच्यारूपाने मंत्री तर विधान परिषद सदस्य म्हणून निलय नाईक. नाईक यांच्या विकास कामावरून व प्रेरणादायी कर्तृत्वामुळे जनमानसात महानायक वसंतराव नाईक म्हणून आदराने संबोधतात.वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०). विद्यार्थीदशेत त्यांच्यावर जगप्रसिद्ध अमेरिकन विचारवंत डेल कार्नेगी यांच्या विचारांचा प्रभाव पडला. तसेच महाविद्यालयात असताना त्यांची नागपूरमधील प्रख्यात घाटे या ब्राह्मण कुटुंबाशी ओळख झाली. १९४१मध्ये त्यांनी वत्सलाताई घाटे यांच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला. त्यांनी आपली वकीली गोरगरीब, शेतकरी, आदिवासी घटकांच्या हितासाठी केली. त्यामुळे त्यांना सामाजिक बांधिलकी जपणारा वकील म्हणून संबोधले गेले. वत्सलाताई पदवीपर्यंत शिकलेल्या होत्या. त्या वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. महिला सक्षमीकरणासाठी महिला संवाद , महिला मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृती करीत,वसंतराव नाईक यांनी कृषीऔदयोगीक क्षेत्रात अमुलाग्र अशी कामगिरी केली. ते हाडाचे प्रगतशील शेतकरी होते. याशिवाय शेती आणि मातीवर त्यांची निस्सीम भक्ती होती. आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले. अनेक क्रांतीकारी शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून १ जुलै ही त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचे निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतले. तेंव्हा पासून शासकीय कार्यालयात सर्वत्र साजरा होतो. तर नाईक जयंती-कृृृषीदिन 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' साजरा करण्याची अभिनव प्रथा 'थेेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहीमेचे प्रणेते एकनाथराव पवार यांनी पहिल्यांदा सुरू केली. आज गाव, तांडा, शहर कार्यालयाबरोबरच थेेेट बांधावर कृृृषीदिन साजरा केला जातो.[१०] गाव,तांडा,पाल, शहरासह थेट शेत बांधावरही जयंती साजरी होत असलेल्या वसंतराव नाईकांकडे आधुनिक कृषीसंत, शेतकऱ्यांचे भाग्यविधाते म्हणूनच पाहिल्या जाते. कार्यालयाबरोबरच थेट शेतशिवारात जयंती साजरी होत असलेले वसंतराव नाईक हे देशातील एकमेव उदाहरण आहे. नाईक यांनी भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले. ते भारतीय कृषी संशोधन परिषदांचे अर्थस्थायी समितीचे सदस्यही होते. त्यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागाद्वारे 'कृषी संजिवन सप्ताह' म्हणून केला जातो. थेट शेत बांधावर शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन केल्या जाते. तसेच सामाजिक क्षेत्रातील संस्था द्वारा थेट बांधावर 'शेतकरी कृतज्ञता सप्ताह' म्हणून सुद्धा साजरा करीत महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहिली जाते.इ.स.१९४६ - पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद.
इ.स. १९५१- विदर्भ प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यकारिणी सदस्य
इ.स. १९५२ - पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेस पक्षातर्फे मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या विधिमंडळावर आमदार.
इ.स. १९५६ - मध्यप्रदेश राज्याचे सहकार , कृषी व दुग्धव्यवसाय मंत्री.
इ.स. १९५७ - द्विभाषिक मुंबई राज्याचे कृषीमंत्री. इंडिया कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर सोसायटीचे सदस्य
इ.स.१९५८ - आंतरराष्ट्रीय राईस कमिशनच्या भारतीय शिष्टमंडळात निवड.जपान ,तोक्यो येथे भेट
इ.स. १९६० - लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्यक्ष.
इ.स. १९६०-६३ - महाराष्ट्राचे महसूलमंत्री.(कमाल जमीनधारणा कायदा आणला.)
इ.स. १९६३ - ५ डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
इ.स.१९६७ - मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान
इ.स. १९७२ - तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री.
इ.स. १९७७ - वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार. १,५२,०५७ मतांनी विजयी.वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले. पुढे त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९७० च्या दशकात मुंबईतील कम्युनिस्ट-नेतृत्वात कामगार संघटनांचे प्रतिउत्तर म्हणून शिवसेना उभी करण्याच्या नाईकांच्या धोरणाला अनेक पत्रकार आणि राजकीय अभ्यासाचे तज्ज्ञ, उजवे विचार पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उदयाचे श्रेय देतात.
0 टिप्पण्या