Ticker

6/recent/ticker-posts

बिरसा फायटर्सच्या आंदोलनामुळे विटांचे दर कमी

२४ हजार वरून १६ हजार रूपये विटांचा भाव निश्चित!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा :वीटांची दरवाढ तात्काळ कमी करा,वीटांचे दर मनमानी पद्धतीने वाढवून ग्राहकांची लुबाडणूक करणा-या वीटभट्टीमालकांवर कायदेशीर कडक कारवाई करावी,अवैद्य वीटभट्टी कारवाई करावी, राॅयल्टी न भरणा-या वीट भट्टीमालकांवर कारवाई करावी,अवैद्य वीट भट्टी व ग्राहकांची लुबाडणूक करणा-या वीटभट्टीमालकांना पाठीशी घालणा-या संबंधित तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करा,अशा मागण्यांसाठी बिरसा फायटर्स तालुका शाखा पानसेमल संघटनेकडून तहसीलदार पानसेमल कार्यालय समोर दिनांक २९ मे २०२५ रोजी ठिय्या आंदोलन छेडण्यात आले होते.वीटांचे दर कमी करा नाहीतर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचेही निवेदन बिरसा फायटर्स पानसेमल संघटनेकडून तहसीलदार पानसेमल व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पानसेमल यांना निवेदन देण्यात आले होते.या आंदोलनात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,पानसेमल तालुकाध्यक्ष विजय बरडे, सचिव भारत बरडे,सहसचिव विष्णू चौहान, कोषाध्यक्ष रोहित बरडे,सल्लागार राहूल मोरे,शिरपूर तालुकाध्यक्ष नरेश पावरा आदि असंख्य बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान बिरसा फायटर्स व वीट भट्टी मालक आमने सामने आले होते. प्रशासनाने मध्यस्थी भूमिका घेऊन बिरसा फायटर्स पदाधिकारी व वीटभट्टीमालकांची तहसील कार्यालयात बैठकीत चर्चा घडवून आणली होती.
          अखेर पानसेमल तालुक्यातील करणपुरा, बायगोर, बांदरीयावड,राखी बुद्रुक, राखी खुर्द, धावडी, भातकी इत्यादी गांवातील ग्रामस्थांनी पहिली बैठक १३ जून २०२५ रोजी राखी बुजूर्ग येथील 
हनुमान मंदिर येथे घेतली,त्या बैठकीत वीटभट्टीमालक उपस्थित राहिले नाहीत, म्हणून दुसरी बैठक  दिनांक २२ जून २०२५ रोजी बांदरीयावड येथे घेण्यात आली.बैठकीत अनेक गांवातील सरपंच, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.३ हजार विटांचे तब्बल २४ हजार रूपये ग्राहकांकडून वीटभट्टीमालक घेत होते.या बैठकीत सर्वानुमते वीटांचे दर कमी करून १६ हजार रूपये निश्चित केल्याचा ठराव मंजूर करण्यात आला व तो ठराव संबंधित वीटभट्टीमालक तथा कुंभार समाजातील प्रमुखांना पाठविण्यात आला.तसेच या ठरलेल्या विटांच्या दरा व्यतिरिक्त कोणी जास्तीचे पैसे घेतल्यास त्याच्याविरोधात प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या