Ticker

6/recent/ticker-posts

आश्रमशाळेत कला शिक्षक भरती करा- बिरसा फायटर्सची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार -सन २०१९-२०१९ भरती अनुषंगाने शासकीय आदिवासी आश्रम शाळेत कला शिक्षकांची कायमस्वरूपी पदभरती करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,कार्याध्यक्ष बिरबल पावरा,आकाश तडवी,योगेश रावताळे,हिरालाल वळवी,प्रकाश गावित, मनिलाल गायकवाड, भास्कर गावित,कालूसिंग कोकणी,दिलीप गावित, अरूण भंडारी,गोपाल भोसले,राजू गावित, फिलीप गावित, प्रकाश रावताळे,राकेश वळवी,शिलवान कोकणी,विक्रम कोकणी
आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
                          कला शिक्षक हे विद्यार्थांना कलेचे शिक्षण देतात.चित्रकला,शिल्पकला, कला इतिहास व सौंदर्य शास्त्र यांसारख्या विषयाचे मार्गदर्शन करतात. कला शिक्षक हे नुसते कला शिकवत नाहीत, तर विद्यार्थांमध्ये सौंदर्य दृष्टी, कल्पनाशक्ती,विद्यार्थांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे काम करतात.ते विद्यार्थांना कलेच्या माध्यमातून स्वत: ला व्यक्त करण्याची संधी देतात.
                       महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णय १३ जून २०१९ शासकीय आदिवासी आश्रमशाळेत कला,क्रीडा व संगणक शिक्षकांची भरती करण्यात यावे,असा शासन निर्णय होता.या पदभरतीत महाराष्ट्रात एकूण १५०० क्रीडा शिक्षकांची नेमणूक करण्यात आली.नंदूरबार जिल्ह्य़ात क्रीडा शिक्षकांची भरती केली.परंतू कला शिक्षकांची भरती केलीच नाही. त्यामुळे या भरतीपासून कला उमेदवार वंचित राहिले आहेत.०३ जुलै २०२३  शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करणेबाबत शासन निर्णय होता.परंतू नंदुरबार जिल्ह्य़ात अद्यापही कला शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही.
                     सरकारला कला शिक्षकांची गरज नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.विद्यार्थांच्या शैक्षणिक नुकसानाला आदिवासी विकास विभाग जबाबदार आहे.अनेक उमेदवार हे बेरोजगार असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.काही उमेदवाराची वयोमर्यादा संपलेली आहे,त्यांची नोकरीची आशा संपलेली आहे.मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत या शिक्षकांना वयाची अट असल्याकारणास्तव नेमणूक मिळाली नाही.तसेच गेल्या ६ वर्षांपासून कला शिक्षक भरती नंदुरबार जिल्ह्य़ात व्हावी,म्हणून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. परंतू त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.म्हणून नंदूरबार जिल्ह्य़ात स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देऊन सन २०१८-१९ भरतीच्या अनुषंगाने शासकीय आश्रमशाळेत कला शिक्षकांची पदभरती करावी.अन्यथा आदिवासी बिरसा फायटर्स  संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार येईल,असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या