Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन मोठया थाटात संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : नुकतेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 25 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन श्री कृष्ण लांस नाशिक येथे मोठया थाटा माटात त्रेवार्षिक संपन्न झाले यामध्ये सर्व जिल्ह्यातून महाराष्ट्रातून  प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये महाभव्य रॅली - उदघाटन सत्र - सभा प्रतिनिधी नोंदणी 
यामध्ये राष्ट्रीय नेते कॉम्रेड अमर जीत कौर - कॉम्रेड डॉ भालचंद्र कोंगो नवी दिल्ली हे उपस्थित होते. 
त्याच प्रमाणे राज्याचे नेते कॉम्रेड ऍड सुभाष लांडे - कॉम्रेड प्रकाश रेड्डी - कॉम्रेड शाम काळे - कॉम्रेड राजू देसले - कॉम्रेड डॉ महेश कोपुलवार - कॉम्रेड शिवकुमार गणवीर व इतर गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. 
यात संघटनात्मक अहवाल मसुदा - राजकीय अहवाल मसुदा व तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा करण्यात आली. 
हे अधिवेशन तीन दिवस चालले 
यात चंद्रपूर जिल्ह्यातून कॉम्रेड राजू गैनवार - कॉम्रेड रवींद्र उमाटे - कॉम्रेड विनोद झोडगे पाटील - कॉम्रेड वंदना गैनवार - कॉम्रेड कुंदा कोहपरे इत्यादीनी उपस्थित राहून प्रतिनिधित्व केले. 
राज्यातून आलेल्या प्रतिनिधिनी संघटनात्मक व राजकीय अहवाला वर चर्चेत भाग घेतला 
व नवीन राज्य कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य व कौन्सिलची निवड करण्यात आली. आणि क्रांतिकारी गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या