चित्रा न्यूज प्रतिनिधी
शहादा : शहादा तालुक्यातील वडगांव, शहाणा व इतर गांवातील लाभार्थी व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत गेल्या ४-५ महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत,लाभार्थ्यांस तात्काळ पैसे मिळावेत, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,डामरखेडाचे आकाश माळीच आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्रातील एक सामाजिक सुरक्षा योजना आहे.राज्यातील निराधार, वृद्ध, अपंग ,अंध,शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना तसेच विधवा,घटस्फोटित, अत्याचारित महिला,वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला,इत्यादींना आर्थिक मदत करण्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे.या योजनेतून दरमहा ६०० रूपये प्रति लाभार्थी आणि कुटुंबात एक पेक्षा अधिक जास्त लाभार्थी असल्यास दरमहा ९०० रूपये अर्थसहाय्य मिळते.
शहादा तालुक्यातील वडगांव, शहाणा व इतर गांवातील लाभार्थ्यांस गेल्या ४-५ महिन्यांपासून अद्याप पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.तरी शहादा तालुक्यातील वडगांव, शहाणा व इतर गांवातील लाभार्थी व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनांचे पैसे तात्काळ मिळावेत.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या