चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-राजर्षी छञपती शाहू महाराज यांचे कार्य अफाट व अनमोल असे होते. आणि त्यांची प्रतिभाही तितकीच अफाट होती.तळागाळातील समाजा सोबतची त्यांची असलेली बांधिलकी आजच्या काळातही अनेकांना विचार करायला लावणारी आहे.शाहू महाराज हे देशातील पहिले राजे होते ज्यांनी स्वत:च्या संस्थानात आरक्षण सुरु केले.राजेंना ५० वर्षांचेच जीवन लाभले;पण एवढ्या अल्पायुष्यातही त्यांनी जे कार्य केले ते मोठे तसेच अनमोल होते.म्हणुन आजही त्यांचे विचार व कार्य सर्वांसाठी आदर्शवत आहेत.असे मत बी.एस.नांदापुरकर, सहायक निबंधक,सहकारी संस्था, उदगीर यांनी व्यक्त केले.
सहायक निबंधक सहकारी संस्था उदगीर येथील कार्यालयात दि.२६ रोजी राजर्षी छञपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली तेंव्हा नांदापुरकर बोलत होते.


0 टिप्पण्या