Ticker

6/recent/ticker-posts

भीमशक्ती नगरमध्ये डेंग्यू-मलेरियाचा कहर; स्वच्छतेसाठी वंचित बहुजन माथाडी युनियनचे आयुक्तांना निवेदन!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
पिंपरी चिंचवड : भोसरी विधानसभा क्षेत्रातील सेक्टर २०, स्पाईन रोड, मोरे वस्ती, भीमशक्ती नगर परिसर सध्या गंभीर अस्वच्छतेच्या विळख्यात असून, डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रकोप वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्यावतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी युनियनचे शहराध्यक्ष संजय ठोंबे यांनी महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागावर जोरदार टीका करत स्पष्ट इशारा दिला की, “संपूर्ण परिसर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या जीवघेण्या आजारांच्या छायेत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. जर प्रशासनाने वेळेत उपाययोजना केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

यावेळी दिलेल्या निवेदनात पुढील ठाम मागण्या करण्यात आल्या:

• संपूर्ण परिसरात तत्काळ स्वच्छता मोहीम राबवावी.
• अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी.
• डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधक फवारणी त्वरित सुरु करावी.
• मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करावे, अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या. यावेळी माथाडी ट्रान्स्पोर्ट जनरलचे  संजय ठोंबे,  शहर सचिव राजेंद्र साळवे, माजी उपाध्यक्ष संतोष जोगदंड, उपाध्यक्ष नारायण मस्के आणि अन्य पदाधिकारी सहभागी होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या