चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली: महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री मा.ना.श्री. नीतेशजी राणे यांचे गडचिरोली जिल्ह्यात प्रथम आगमन झाले. या आगमनानिमित्ताने माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोकजी नेते यांच्यासह भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत पुष्पगुच्छ देत जल्लोषात स्वागत केले.
या प्रसंगी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे,माजी आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,माजी जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, कि.मो.प्र.सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणयजी खुणे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्रजी ओल्लालवार जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, समन्वयक प्रमोदजी पिपरे,डॉ. चंदाताई कोडवते, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या दौऱ्याच्या भेटीने गडचिरोली जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारला आहे.
0 टिप्पण्या